बांधकाम विभागाकडून तांबवे पुलावर तात्पुरती मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:29+5:302021-07-27T04:40:29+5:30
तांबवे : बांधकाम विभागाकडून तांबवे पुलावर तात्पुरती मलमपट्टी सुरू आहे. जोरदार झालेल्या अतिवृष्टीने व कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नवीन ...
तांबवे : बांधकाम विभागाकडून तांबवे पुलावर तात्पुरती मलमपट्टी सुरू आहे. जोरदार झालेल्या अतिवृष्टीने व कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नवीन तांबवे पुलावरून दुसऱ्यांदा पाणी गेल्याने पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. महापूर ओसरल्यावर बांधकाम विभागाच्यावतीने नवीन पुलावर साचलेला गाळ काढण्यात आला व तातडीने पुलाच्या तुटलेल्या अँगलच्या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे.
महापुरात पुलाचे कठडे व अँगल पाण्याच्या दाबाने तुटून पडले व पूर्वेकडील पुलाच्या बाजूचा भरावही वाहून गेला होता. यामुळे पुलावरून वाहतूक करताना धोकादायक होते म्हणून तांबवे ग्रामपंचायतीच्यावतीने कऱ्हाड येथील शासनाच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना तांबवे पुलाचे व संरक्षक अँगलचे पुरामुळे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यानुसार बांधकाम विभागाच्यावतीने डागडुजी करण्यात आली.