सातारा : निवडणूक संपली की राजकारण संपते, असे म्हणतात; पण येथील शाहूनगर भागात एका अनोख्या फलकाने साºयांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘आपल्या विभागातून आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे आपल्या विभागासाठी फंड आलेला नाही,’ असा मजकूर या फलकावर लिहिला आहे. रस्त्यांसह मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा फलक लावला गेल्याची कुजबूज परिसरात आहे.
येथील शाहूनगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठी वसाहत वाढली आहे. शहराचा विस्तार होत असताना या परिसराला नागरिकांनी भरभरून पसंती दिली. पण त्या तुलनेने येथे अपेक्षित विकास झाला नाही. आमदार-खासदारांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या परिसराच्या विकासाचे केवळ आश्वासन दिले असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या तोंडावर चकाचक रस्त्यांची आमिषे दाखवून प्रत्यक्षात मात्र या रस्त्यावर मुरूमही पडला नाही.
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. महानगरांमध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने असलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांसाठी शुद्ध हवेच्या ठिकाणी बंगले बांधून दिले आहेत; पण मूलभूत गरजांसाठी या ज्येष्ठांना किमान पोवई नाका परिसरापर्यंत जावे लागते. दुचाकी चालवत या रस्त्यावरून जाण्यामुळे गाडी घसरून काहींना गंभीर दुखापतही झाली आहे. येथेच इंग्रजी माध्यमाची एक मोठी शाळा आहे. या शाळेत मुलांना सोडायला येणाºया महिलाही दगडांवरून गाडी घसरल्यामुळे जखमी झाल्या आहेतपादचाºयांना काढावा लागतोय सांडपाण्यातून मार्गशाहूनगर परिसरात ५ हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. बँक, भाजी मंडई, दवाखाना, पेट्रोल आदींसाठी येथील रहिवाशांना पोवईनाका परिसरात यावे लागते. शाहूनगरमधील प्रत्येक गल्ली-बोळातील रस्त्यावरचे डांबर खूप वर्षाआधीच गुल झाले आहे. रोज सकाळी फिरायला जाणाºयांना रस्त्यावरील सांडपाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. या पाण्याची दुर्गंधीही प्रकृतीसाठी हानिकारक आहे.