हुतात्म्यांच्या स्मृर्ती जागविण्याचे काम व्हावे : बाळासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:25+5:302021-09-10T04:47:25+5:30

पुसेसावळी : हुतात्म्यांची पावन भूमी असलेल्या वडगावमध्ये दरवर्षी ९ सप्टेंबरला हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो. त्या कार्यक्रमास ...

There should be work to awaken the memory of martyrs: Balasaheb Patil | हुतात्म्यांच्या स्मृर्ती जागविण्याचे काम व्हावे : बाळासाहेब पाटील

हुतात्म्यांच्या स्मृर्ती जागविण्याचे काम व्हावे : बाळासाहेब पाटील

Next

पुसेसावळी : हुतात्म्यांची पावन भूमी असलेल्या वडगावमध्ये दरवर्षी ९ सप्टेंबरला हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो. त्या कार्यक्रमास गेल्या अनेक वर्षांपासून येण्याचे भाग्य लाभत असून हुतात्म्यांच्या स्मृर्ती जागविण्याचे काम या माध्यमातून व्हावे, असे मत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. ते वडगाव (ज.स्वा) ता. खटाव येथे हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी श्रीनिवास पाटील, सुनील माने, प्रदीप विधाते, मानसिंग जगदाळे, कल्पना खाडे, बंडा गोडसे, सुरेंद्र गुदगे, शिवाजीराव सर्वगोड, संतोष घार्गे, भाग्यश्री भाग्यवंत, सी.एम.पाटील, संदीप मांडवे, जितेंद्र पवार, जयश्री कदम, रेखा घार्गे, चंद्रकांत पाटील, अर्जुनराव खाडे ,प्रकाश घार्गे, जनार्दन कासार (प्रांताधिकारी), शैलेश सूर्यवंशी (प्रांताधिकारी), किरण जमदाडे (तहसिलदार) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बाळासाहेब पाटील म्हणाले की, हुतात्म्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालण्यासाठी या हुतात्मा दिनास उत्सवाचे स्वरूप द्यावे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सव येत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन उत्सव साजरा करावा. त्याचबरोबर रखडलेल्या विकास कामांना चालना दिली जाईल आणि पाणी प्रश्नासाठी पुढाकार घेऊन राहिलेली उरमोडीची कामे मार्गी लावली जातील. यावेळी श्रीनिवास पाटील, बंडा गोडसे, सुनील माने आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमास पुसेसावळी परिसरातील विविध गावचे सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, गोवामुक्ती स्वातंत्र सैनिक संघटना व वडगाव ग्रामस्थ उपस्थित होेते. सूत्रसंचालन काशीनाथ दुटाळ यांनी केले, तर हुतात्मा पुत्र वसंतराव घार्गे आभार यांनी मानले.

Web Title: There should be work to awaken the memory of martyrs: Balasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.