कऱ्हाड पालिकेतील सभेत नगराध्यक्षांच्या अवमानाचा तिसरा अंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:44 PM2017-11-22T22:44:27+5:302017-11-22T22:56:59+5:30

कऱ्हाड : विषय पत्रिकेवरील ४८ विषयांपैकी अवघ्या तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी देत कºहाड पालिकेतील जनशक्ती आघाडीने उर्वरित विषय हे स्थायीपुढेच आले पाहिजेत.

Third digit of the title of the head of the municipality in the meeting of the Karhad Municipal Corporation | कऱ्हाड पालिकेतील सभेत नगराध्यक्षांच्या अवमानाचा तिसरा अंक

कऱ्हाड पालिकेतील सभेत नगराध्यक्षांच्या अवमानाचा तिसरा अंक

Next
ठळक मुद्देसर्वसाधारण सभेतील विषय ‘जनशक्ती’ने नाकारलेतीन विषयांना मंजुरी; उर्वरित विषय स्थायीला घेण्याचे संकेत

कऱ्हाड : विषय पत्रिकेवरील ४८ विषयांपैकी अवघ्या तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी देत कºहाड पालिकेतील जनशक्ती आघाडीने उर्वरित विषय हे स्थायीपुढेच आले पाहिजेत. असे संकेत दिले खरे पण यादरम्यान पिठासन अधिकारी म्हणून काम करणाºया नगराध्यक्षा आपली जागा सोडण्यापूर्वीच जनशक्तीच्या नगरसेवकांनी सभागृह सोडल्याने नगराध्यक्षांच्या अवमानाचा बुधवारी तिसरा अंक पार पडल्याची चर्चा बुधवारी पालिका वर्तुळात सुरू आहे.

कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पालिकेच्या सभागृहात पार पडली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. तर उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. केवळ पाऊणतासाच्या सभेत अवघ्या तीन विषयांना सत्ताधारी जनशक्तीने मंजुरी मिळवली खरी; पण उरलेले सर्व विषय पुन्हा एकदा प्रलंबित पडले आहेत.

यापूर्वी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे नगराध्यक्षा रोहिणी शिंदेंना अश्रू आवरता आले नाहीत. याची चर्चा कºहाडात आजही सुरूच आहे. हा नगराध्यक्षांच्या अवमानाचा पहिला अंक मानला जातो. तर १६ नोव्हेंबर रोजी बोलविलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला जनशक्ती आघाडीने बहिष्कार तर टाकलाच; पण त्यानंतर लगेच दुसºया दिवशी एका कारपेट रस्ता भूमिपूजनाला नगराध्यक्षांना डावलून पुन्हा एकदा त्यांचा अवमान केल्याची चर्चा आहे. त्यात भरीस भर म्हणून बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत सभा सुरू असताना केवळ तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी घेऊन मधूनच कोणाचीही परवानगी न घेता जनशक्तीच्या नगरसेवकांनी सभागृह सोडल्याने हा त्यांच्या अवमानाचा तिसरा अंक झाल्याची चर्चा नागरिकांच्यात सुरू आहे.

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडीमुळे पालिकेतील बुधवारची सभा वादळी होईल, अशी चर्चा लोकांच्यात होती. त्यामुळे सभेच्या सुरुवातीलाच आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी स्थायीची बैठक घेणार नसल्याचे आपण कोणत्या अधिकारांतर्गत सांगितले असल्याचा प्रश्न नगराध्यक्षा शिंदे यांना विचारला. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी नगराध्यक्षांना सर्व अधिकार आहे, असा खुलासा केला.

नगराध्यक्षांना लोकांनी निवडून द्यायचे आणि त्यांनाच डावलायचे हा लोकशाहीचा अपमान आहे, हे सहन क रणार नाही. असे सांगत पावसकरांनी कायद्याचे पुस्तकच काढले. त्यावर वाटेगावकरांनी येथून पुढच्या स्थायीच्या सभा मग कायद्यानुसारच होतील, असा इशारा दिला.

उपनगराध्यक्षांना सभा बोलविण्याचा अधिकार
सात दिवसांच्या आत जर स्थायी समितीची बैठक नगराध्यक्षांनी घेतली नाही तर उपाध्यक्षांना ती बोलविण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना विचारला. त्यावर डांगे यांनी कलम ८२ मधील २ व ३ नुसार उपाध्यक्षांना स्थायीची बैठक घेण्याचे अधिकार असल्याचे सांगितले. त्यामुळे जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांच्या चेहºयावर समाधान दिसत होते.
पावसकरांना अधिकार कुणी दिला : जयवंत पाटील
स्थायी समितीच्या बैठका घेणार नसल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांना हे अधिकार कुणी दिले. स्थायीची बैठक घेण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असतात व त्या नसतील तर उपनगराध्यक्षांना असतात. मग याबाबत भाष्य करण्याचा अधिकार पावसकरांना कुणी दिला? असा सवाल उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सभागृहात केला.
नगराध्यक्षा या स्टॅम्प आहेत का? : पावसकर
कºहाडच्या नगराध्यक्षांना मोठ्या मताधिक्याने शहरातील जनतेने निवडून दिले आहे. त्यांना स्थायी समितीची सभा केव्हा व कधी घ्यायचे अधिकार आहेत. मात्र, आपण बोलू तेव्हाच सभा घ्यायची, असे सांगत सभा घेण्यावर दबाव टाकणाºयांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की येथे हुकू मशाही नाही लोकशाही आहे. आम्ही मंजूर केलेल्या कामांवर नगराध्यक्षांनी फक्त सह्या करायला त्या काय स्टॅम्प आहेत का? असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी सभागृहात उपस्थित केला.

ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी ड्रेनेज योजनेच्या कामाची वर्षभरात कधी चौकशीसुद्धा केलेली नाही. की काम करणाºया लोकांचे तोंडही बघितलेले नाही. मात्र, आम्ही ज्यावेळी आझाद चौकात रस्त्याच्या कामाचे उद्घाटन घेतले. त्यानंतर या अण्णा ‘बहाद्दरां’नी त्या कामाच्या ठेकेदारास कामाची बिले काढणार नसल्याचे सांगितले. जर कामांची बिलेच निघणार नसतील तर कामे कशी करायची? असा प्रश्न उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.

Web Title: Third digit of the title of the head of the municipality in the meeting of the Karhad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.