शेरेमध्ये दिवसात लावली हजार रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:34+5:302021-07-10T04:26:34+5:30

माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात शेरे व परिसरात अडीच हजार झाडे लावली व जगवली आहेत. हा वृक्षारोपणाचा वसा ...

Thousands of seedlings planted per day in Shere | शेरेमध्ये दिवसात लावली हजार रोपे

शेरेमध्ये दिवसात लावली हजार रोपे

Next

माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात शेरे व परिसरात अडीच हजार झाडे लावली व जगवली आहेत. हा वृक्षारोपणाचा वसा असाच चालू ठेवला आहे. याच मोहिमेचा पुढील टप्पा गाठण्यासाठी महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व युवक कार्यकर्त्यांच्या सहभागातून वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यात आले. वृक्षारोपण सुरू करण्याआधी सामाजिक वनीकरण विभागाचे वन संरक्षक नाईकडे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनपाल रमेश जाधवर, बंडातात्या कऱ्हाडकर, सरपंच संगीता निकम, रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते भूमाता व वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपणास प्रारंभ झाला.

अशोक, सिल्व्हर ओक, पिंपळ, वड, कडुनिंब, जांभूळ, कांचन, आपटा या झाडांची लागवड करण्यात आली. लावलेल्या झाडांना पाणी देतच त्यांना जाळ्या लावण्यात आल्या. यावेळी कन्या वनसमृध्दी योजनेतून ५५० फळ झाडांचे वाटप करण्यात आले. प्रदीप निकम यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप निकम यांनी प्रास्ताविक केले.

फोटो : ०९केआरडी०३

कॅप्शन : शेरे, ता. कऱ्हाड येथे महावृक्षारोपण अभियानप्रसंगी बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या हस्ते कन्या वनसमृध्दी योजनेतून फळ झाडांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Thousands of seedlings planted per day in Shere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.