टोलनाक्यावरील दृश्ये पोलीस कंट्रोलरुममध्ये !

By admin | Published: October 14, 2015 10:21 PM2015-10-14T22:21:14+5:302015-10-15T00:28:32+5:30

आॅनलाईन प्रक्षेपणाचे उद्घाटन : गुन्हेगारांच्या तपासासाठी ठरणार फायदेशीर

TollNews on the police control room! | टोलनाक्यावरील दृश्ये पोलीस कंट्रोलरुममध्ये !

टोलनाक्यावरील दृश्ये पोलीस कंट्रोलरुममध्ये !

Next

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण आॅनलाईन प्रणालीमुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून पाहता येणार आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी, आंदोलने याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.आनेवाडी टोलनाक्यावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आता आॅनलाईन प्रणालीमुळे पोलीस मुख्यालय, कंट्रोल रूम, भुर्इंज आणि वाई पोलीस ठाण्यात दिसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि रिलायन्स इन्फ्राचे वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आॅनलाईन प्रक्षेपणामुळे टोलनाक्यावरील हुल्लडबाजी, मारामारी अशा गैरकृत्यांना आळा बसणार असून आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी घटनेची तीव्रता पाहून पोलीस बंदोबस्ताविषयी अंमलबजावणी करणे सोपे होणार आहे. आनेवाडी टोलनाका हा संवेदनशील ठिकाण बनले आहे. त्यामुळे हे आॅनलाईन प्रक्षेपण फायद्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)

हुल्लडबाजांवर राहणार वचक---या उपक्रमाचे कौतुक करून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले की, टोलनाक्यावर भांडणे, मारामारी करणाऱ्या हुल्लडबाजांना धडा शिकविण्यास या प्रणालीची मदत होणार आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या तपासामध्येही या थेट प्रक्षेपणामुळे मदत होणार आहे. खऱ्या आरोपींना शोधणे यामुळे सहज शक्य होणार आहे.

Web Title: TollNews on the police control room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.