जीएसटी विरोधात सोमवारपासून वाहतूकदारांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 05:34 PM2017-10-06T17:34:31+5:302017-10-06T17:34:31+5:30

Traffic congestion from GST since Monday | जीएसटी विरोधात सोमवारपासून वाहतूकदारांचा चक्काजाम

जीएसटी विरोधात सोमवारपासून वाहतूकदारांचा चक्काजाम

Next

सातारा,दि.६ : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँगे्रसच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ९ व १० आॅक्टोबर रोजी राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे,ह्ण अशी माहिती या संघटनेचे संघटनेचे संचालक प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


गवळी म्हणाले, ह्यमाल व प्रवासी वाहतूक व्यवसाय सध्याच्या घडीला पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. विविध करांचा बोजा वाहतूकदारांच्या माथ्यावर मारण्यात आला आहे.

जीएसटी करासह, रोड कर, डिझेल कर, टोल आमच्याकडे वसूल केला जात आहे. सर्व यंत्रणा ट्रान्सपोर्टशिवाय चालूच शकत नाही. तरीही याच व्यवसायावर सर्वांची वाईट दृष्टी पाहायला मिळते.

महामार्गावर महामार्ग पोलिस, जिल्हा पोलिस, तालुका पोलिस, पीसीआर, रात्रीचे गस्त घालणारे पोलिस आदींकडून पैशांची वसुली केली जाते. या पोलिसांच्या भीतीने परजिल्ह्यातील वाहतूकदारांनी जायचे बंद केले आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेतली; पण त्यांनीही गांभीर्याने घेतले नाही.


वाहनांवर ठराविक कंपन्यांचेच रेडिअम लावावेत, असा खाक्या आहे. महिनोमहिने वाहनांचे पासिंग होत नाही. हे तर वेगळेच प्रश्न आहेत. व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. इन्शुरन्स १५० टक्के वाढला आहे. धंदा बंद असल्याने गाड्या ओढून नेल्या जात असल्याचे श्रीनिवास म्हेत्रे यांनी सांगितले.


सक्तीचे वस्तू आणि सेवा कर नोंदणीचे बंधन करू नका, डिझेलच्या वाढत्या किमतीवर असलेले कर कमी करावेत व देशभर एकाच दरात डिझेल व पेट्रोल मिळावे, परिवहन विभाग व पोलिस यंत्रणेकडून होणाºया जाचावर बंधने घालण्यात यावीत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

पोलिसांचा ससेमिरा...

महामार्गावर वडाप व्यवसायांसह इतर माल वाहतूक करणाºया वाहन चालकांशी पोलिस उद्धटपणे बोलत असतात. तो गुन्हेगारच आहे, अशा अविर्भावात त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. असा त्रास आम्हाला झाला तर आता जिथे वाहन अडवले आहे, त्याच ठिकाणी ठेवून आम्ही निघून जाऊ, मग कोणतीही कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील, असा इशाराही गवळी यांनी यावेळी दिला.

 

Web Title: Traffic congestion from GST since Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.