जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 01:07 PM2020-10-31T13:07:45+5:302020-10-31T13:09:29+5:30

Sataranews, Transfar सातारा जिल्ह्यातील नायब तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश नुकतेच शासनाच्यावतीने काढण्यात आले आहेत.

Transfer of Deputy Tehsildar of the district | जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची बदली

जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची बदली

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील नायब तहसीलदारांची बदलीबदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास शिस्तभंग कारवाई

सातारा : सातारा जिल्ह्यातील नायब तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश नुकतेच शासनाच्यावतीने काढण्यात आले आहेत.

नायब तहसीलदार व बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे -
संतोष सोनवणे, निवडणूक शाखा वाई बदलीचे ठिकाण निवडणूक नायब तहसीलदार मावळ पुणे, अंकुश हिवरे नायब तहसीलदार संजय गांधी योजना माण बदलून निवडणूक शाखा नायब तहसीलदार फलटण, अनिल ठोंबरे महसूल, फलटण बदलून निवासी नायब तहसीलदार इंदापूर पुणे.

शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील नियम ३० नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत, असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच डाकने परत करावेत.

बदली आदेशानुसार तत्काळ प्रस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ही गैरवर्तणूक समजून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

Web Title: Transfer of Deputy Tehsildar of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.