वृक्ष संवर्धन हीच शिवरायांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:46 AM2021-02-17T04:46:08+5:302021-02-17T04:46:08+5:30
सदाशिवगड (ता. कऱ्हाड) येथे शिवजयंतीचे औचित्य साधत १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सलीम मुजावर, मठाधिपती ...
सदाशिवगड (ता. कऱ्हाड) येथे शिवजयंतीचे औचित्य साधत १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सलीम मुजावर, मठाधिपती विठ्ठल महाराज स्वामी, दुर्गप्रेमी नगरसेवक सौरभ पाटील, दीपक अरबुणे, सुरेश जोशी, विठ्ठठलराव मुळीक, कैलास कदम, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांच्यासह किल्ले सदाशिवगडचे दुर्गसेवक उपस्थित होते.
प्रारंभी हजारमाची येथील पायरी मार्गापासून गडावरील सदाशिव मंदिरापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. वडाच्या नावाने चांगभलं, पिंपळाच्या नावाने चांगभलं, येऊन येऊन येणार कोण... झाडाशिवाय हायच कोण, असा जयघोष यावेळी करण्यात आला. वृक्षदिंडीचे गडावर आगमन झाल्यावर दुर्गप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत सदाशिव गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या दुर्गप्रेमींचा अभिनेते सयाजी शिंदे यांनी गौरव केला.
विठ्ठल महाराज स्वामी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. योगेश कुंभार, आबासाहेब लोकरे यांनी स्वागत केले. सौरभ पाटील यांनी सूत्रसंचालन केले; तर उमेश डुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- चौकट
सदाशिवगड संवर्धन राज्यासाठी प्रेरणादायी!
दुर्गप्रेमी नगरसेवक सौरभ पाटील यांनी सदाशिवगड संवर्धनासाठी केलेल्या आजवरच्या कामांची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनी सदाशिवगड पाणी योजनेसह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत सदाशिवगडावरील कार्य राज्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार काढले.