रेशन दुकानातील बायोमेट्रिक पध्दत बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:05+5:302021-04-24T04:40:05+5:30
निवेदनात म्हटले आहे की, बायोमेट्रिक पद्धतीमुळे संसर्ग वाढण्याची भीती दुकानदारांनी व्यक्त केली आहे. हा प्रश्न केंद्र शासनाच्या अन्न पुरवठा ...
निवेदनात म्हटले आहे की, बायोमेट्रिक पद्धतीमुळे संसर्ग वाढण्याची भीती दुकानदारांनी व्यक्त केली आहे. हा प्रश्न केंद्र शासनाच्या अन्न पुरवठा खात्याकडे असल्याने जिल्हा व राज्य संघटनेतर्फे माजी खासदार गजानन बाबर व सर्व जिल्ह्य़ाचे जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत बायोमेट्रिक पद्धत बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी काही महिने अशी परवानगी देण्यात आली होती. यावर्षी वाढता संसर्ग पाहून या मागणीचा विचार होणे गरजेचे आहे. रेशन दुकानदारांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे, ही मागणी प्रलंबित असून ती मंजूर करावी. जिल्ह्य़ात गेल्यावर्षी जुलै ते नोव्हेंबर या महिन्यांच्या धान्य वाटपाचे कमिशन अद्याप दिलेले नाही, ते त्वरित द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.