शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

दुचाकी-ट्रक अपघातात दोघे गंभीर जखमी; सातारा महामार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:06 AM

दुचाकीवरील जखमी झालेले दोघेही धनगर समाजाचे असून ते आपल्या शेळ्या मेंढ्या घेवून मोहोडेकरवाडी येथे आले होते.

- अभिनव पवार

सातारा : वेळे ता.वाई येथील महामार्गावरील सोळशी फाटा या ठिकाणी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की,  दुचाकीवरून शिवाजी साहेबराव बिचुकले (वय 40) व माधुरी चंद्रकांत बीचुकले (वय 36) दोघेही राहणार वाठार स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा हे मोहोडेकरवाडी, तालुका वाई येथून वाठार स्टेशनला जात होते. वेळे येथे महामार्ग ओलांडताना गुजरातहून तामिळनाडूच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने या दुचाकीला महामार्गावरच जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी तीस ते चाळीस फूट लांब उडून पडली. ट्रक चालक सुरेश कंनन वय 36, राहणार नामकल तामिळनाडू याने अपघातानंतर ट्रक जागेवरच थांबविला. 

दुचाकीवरील जखमी झालेले दोघेही धनगर समाजाचे असून ते आपल्या शेळ्या मेंढ्या घेवून मोहोडेकरवाडी येथे आले होते. ते आज सकाळी त्यांच्या मूळ गावी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात माधुरी यांचे दोन्ही पायाला गंभीर जखमा झाल्या असून शिवाजी यांचेही पायाला गंभीर जखम झाली आहे. या दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात