मलकापुरात कोरोनाची दोन लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:26+5:302021-04-08T04:40:26+5:30

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, नगराध्यक्ष नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, काले ...

Two vaccination centers for corona in Malkapur | मलकापुरात कोरोनाची दोन लसीकरण केंद्र

मलकापुरात कोरोनाची दोन लसीकरण केंद्र

Next

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, नगराध्यक्ष नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र यादव, मंडलाधिकारी पंडितराव पाटील, तलाठी सचिन निकम, नियोजन सभापती प्रशांत चांदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, नूरजहाँन मुल्ला, नगरसेवक सागर जाधव, कमलताई कुराडे, अलका जगदाळे, स्वाती तुपे, निर्मला काशीद, नंदा भोसले, भारती पाटील, किशोर येडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोनाला थांबविण्यासाठी मलकापूरने चांगले काम केले आहे. कोरोना होऊच नये, म्हणून लस घेणे गरजेचे आहे. मलकापूरचा विस्तार पाहता, महामार्गाच्या पूर्व-पश्चिम बाजूस लसीकरण केंद्राची सोय केली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी ३०० नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. यावेळी प्रथम उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी स्वत: लस घेतली आहे. शहरातील सर्व नागरिकांनीही न घाबरता लस घ्यावी.

- कोट

मलकापूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता, लसीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी दररोज लस देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात लवकरच दैनंदिन लस उपलब्ध होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी लस घ्यावी.

- नीलम येडगे, नगराध्यक्षा

- चौकट

४५ वर्षांवरील सर्वांना एक महिन्यात लस

प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी व आशासेविकांच्या मदतीने शहरातील ४५ वर्षांवरील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी पालिकेने घेतलेली आहे. या वयोगटातील सर्व नागरिकांना एक महिन्यात लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे पाणीपुरवठा व आरोग्य सभापती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी स्पष्ट केले.

फोटो : ०७केआरडी०६

कॅप्शन : मलकापूर येथे बुधवारी कोरोना लसिकरण केंद्र सुरू करण्यात आले असून याठिकाणी लस देण्यास प्रारंभ करण्यात आला.

Web Title: Two vaccination centers for corona in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.