भुयारी गटर योजनेमुळे शहराच्या वैभवात भर : संजीवराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:39 AM2021-04-04T04:39:39+5:302021-04-04T04:39:39+5:30

फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक ...

Underground sewer scheme adds to the splendor of the city: Sanjeev Raje | भुयारी गटर योजनेमुळे शहराच्या वैभवात भर : संजीवराजे

भुयारी गटर योजनेमुळे शहराच्या वैभवात भर : संजीवराजे

Next

फलटण

शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

भुयारी गटार योजनेंतर्गत शिवाजीनगर, फलटण येथील मलनिस्सारण केंद्राचे भूमिपूजन संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, सनी अहिवळे नगरसेविका, ज्योत्स्ना शिरतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजीवराजे म्हणाले, फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनिस्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमधून फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून फलटण शहरास भुयारी गटार योजना मंजूर झालेली होती. भुयारी गटार योजनेचे काम करत असताना नक्कीच नागरिकांना थोड्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे; परंतु भुयारी गटार योजनेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाल्यानंतर फलटणमधील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

ते पुढे म्हणाले की, सन १९९१ पासून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांना फलटण शहरासह तालुक्याचा विकास साधण्यामध्ये यश आलेले आहे. आगामी काळात सुद्धा हा विकासाचा रथ अविरत पुढे न्यायचा आहे. शिवाजीनगर परिसरात भूमिपूजन होत असलेल्या मलनिस्सारण केंद्रामध्ये २.५ एमएलडीवर प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच शेती शाळा येथे सुद्धा दुसरे मलनिस्सारण केंद्र होणार आहे. त्यामध्ये ५.५ एमएलडी एवढ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दोन्ही मलनिस्सारण केंद्रांवर प्रक्रिया करून येथील प्रक्रिया केलेले पाणी शेतीला व घरगुती वापरासाठी दिले जाणार आहे.

फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ७६ किलोमीटरपैकी ४२ किलोमीटरचे कामकाज पूर्ण झालेले आहे. मे २०२१ च्या अखेर सर्व काम पूर्ण करण्याचा मानस असून भुयारी गटार योजनेचे काम जिथे जिथे पूर्ण झालेले आहे, तिथे नंतर रस्त्याची कामे त्वरित सुरू करण्यात आलेली आहेत, अशी माहिती नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी दिली.

फोटो - भुयारी गटर योजनेच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि इतर.

Web Title: Underground sewer scheme adds to the splendor of the city: Sanjeev Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.