प्रसारमाध्यमांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा
By admin | Published: October 14, 2015 10:17 PM2015-10-14T22:17:24+5:302015-10-15T00:34:52+5:30
शारदीय व्याख्यानमाला : तारा भवाळकर यांचे प्रतिपादन
कऱ्हाड : समाजातील वास्तवता मांडण्याचे काम आजच्या काळातील प्रसारमाध्यमांकडून केले जाते. या प्रसारमाध्यमातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातून समाजामधील चांगल्या गोष्टींवर लिखाण होणे अपेक्षीत आहे. मात्र, आजच्या काळात वृत्तपत्रांतून पूर्वीसारखी पत्रकारिता केली जात नसल्याचे दिसून येते. वृत्तपत्रातून समाजविघातकच गोष्टी मांडल्या जातात. म्हणून आजच्या प्रसारमाध्यमांचा उपयोग हा समाजाच्या हितासाठी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सांगली येथील डॉ. तारा भवाळकर यांनी केले.पालिकेच्या नगर वाचनालयाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारपासून शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेतील पहिल्या दिवशी डॉ. भवाळकर यांनी ‘प्रसारमाध्ये आणि समाज’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उपस्थिती होती.येथील वेणूताई चव्हाण सभागृहात उद्या गुरुवारी अभय देवरेंचे ‘गंमत गप्पा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शारदीय व्याख्यानमालेस शहरातील साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)