सातारा : ‘नव्या पिढीला आयटी कॉल सेंटर साताऱ्यात उभारण्याचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. साताऱ्याला ऐतिहासिक आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळाचा वारसा लाभला आहे. त्याचा योग्य वापर व्यवसायासाठी व्हावा,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या स्टार कॅटॅगरीत असणाऱ्या ‘हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह अॅण्ड नरिमन टॉवर’ या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी उद्योजक फरोख कूपर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, दादाराजे खर्डेकर, अनिल देसाई, सुनील माने, प्रीती घार्गे, प्रिया घार्गे आदी उपस्थित होते. खासदार शरद पवार म्हणाले, ‘आमदार प्रभाकर घार्गे यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या हातात व्यवसायाची जबाबदारी दिली असून, त्यांनी मुलींचे कतृत्व ओळखले आहे. कारण मुलींमध्ये इतिहास घडविण्याची ताकद असते.’ आ. प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘मी राजकारणात असलो तरी व्यवसायाची कर्मभूमी सातारा आहे. हे मी कधीही विसरलो नाही. साताऱ्यात स्टार कॅटॅगरीचे हॉटेल आवश्यक होते. त्याची पूर्तता मी केली आहे. साताऱ्यात येणारे परदेशी पर्यटक पुण्याला जात होते. नरिमन हे फरोख कूपर यांच्या वडिलांचे नाव आहे. त्यामुळेच मी हे नाव दिले आहे.’ खा.विजयसिंह मोहिते-पाटील, फरोख कूपर, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रिया घार्गे, प्रीती घार्गे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
पर्यटनस्थळाचा विकासासाठी वापर व्हावा
By admin | Published: August 30, 2015 9:53 PM