साताऱ्यात नऊ ठिकाणी लसीकरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:44+5:302021-06-23T04:25:44+5:30

सातारा : सातारा शहराच्या वाढीव भागासह लगतच्या ग्रामीण भागाकरिता एकूण नऊ नवीन लसीकरण केंद्रे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित ...

Vaccination centers at nine places in Satara | साताऱ्यात नऊ ठिकाणी लसीकरण केंद्रे

साताऱ्यात नऊ ठिकाणी लसीकरण केंद्रे

Next

सातारा : सातारा शहराच्या वाढीव भागासह लगतच्या ग्रामीण भागाकरिता एकूण नऊ नवीन लसीकरण केंद्रे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित सुरु करण्यात मान्यता देण्यात आली आहे. लवकरच ही नवीन लसीकरण केंद्रे सुरू होतील, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोरोनावर अद्याप कोणतेही रामबाण औषध अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवणे, शक्य तितक्या जलद लसीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सातारा शहरात राजवाडा येथील पूज्य कस्तुरबा आरोग्य केंद्र, दादामहाराज प्रा. आरोग्य केंद्र्र, गोडोली व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. तथापि लसीकरणाचे वाढते वयोगट याचा विचार करता ही लसीकरण केंद्रे पुरेशी नाहीत. त्यामुळेच लोकसंख्या आणि उपलब्ध लसीकरण केंद्र याचा विचार करता, सातारा शहर आणि परिसरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती.

या मागणीचा विचार करून शासन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नऊ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात परवानगी दिली आहे. संबंधित सर्व केंद्रांवर आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. वाढत्या लसीकरण केंद्रांमुळे लसीकरणाचा वेग वाढणार असून, याचा निश्चितच नागरिकांना लाभ होईल, असा विश्वास खा. उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

(चौकट)

या ठिकाणी लसीकरण केंद्र

श्रीपतराब पाटील शाळा (करंजे पेठ-सातारा), शानभाग शाळा दौलतनगर, ग्रामपंचायत कार्यालय, शाहुपूरी, विशाल सह्याद्रीनगर शाळा शाहूनगर, ग्रामपंचायत कार्यालय विलासपूर, अंगणवाडी शाळा चंदननगर, विक्रांतनगर (खिंडवाडी), पिरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

Web Title: Vaccination centers at nine places in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.