वडूज : कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वडूज नगरपंचायत प्रशासनाने आठवडे बाजारात व शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलून पंधरा हजार पाचशे रुपये दंड वसूल केला.
वडूजच्या आठवडा बाजारात मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत वडूज नगरपंचायत प्रशासन, तसेच पोलीस प्रशासन यांची विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर संयुक्त कारवाई केली. वडूज शहरातील आठवडे बाजार व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच दंडरूपी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी व तो रोखण्यासाठी वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांना वारंवार सूचना करूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विनामास्क फिरणारे, तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांना नागरिकांना दंड आकारण्यात आला. यामध्ये १५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना चाचणी केली नसेल त्यांनी तातडीने चाचणी करण्याचे आदेश मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिले. पाचपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली तर संबंधित दुकान तीन दिवस बंद व दंड आकारण्यात येईल.
आठवडी बाजारात नियमांची कडक अंमलबजाणी करण्यात आली. नागरिकांनी पूर्णपणे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन वडूज नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. यावेळी मुख्याधिकरी माधव खांडेकर व कर निरीक्षक मकरंद जाधव, आरोग्य निरीक्षक राजेंद्र काटकर, लेखापाल सागर कुंभार, अभियंता संतोष कांबळे, विनया कांदळकर, विशाल बैले, मदन गोडसे, शिवाजी फडतरे, संदीप फडतरे, विजय शिंदे, धनाजी कांबळे, प्रसाद जगदाळे उपस्थित होते.
फोटो मेल
२१वडूज बाजार
वडूजच्या आठवडी बाजारात रविवारी नगरपंचायतीच्या प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. (छाया : शेखर जाधव
)