आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:12 AM2021-02-18T05:12:12+5:302021-02-18T05:12:12+5:30

कराड : माजी आ. आनंदराव पाटील यांचा वाढदिवस शुक्रवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ...

Various activities on the occasion of Anandrao Patil's birthday | आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

आनंदराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

Next

कराड : माजी आ. आनंदराव पाटील यांचा वाढदिवस शुक्रवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त माजी आ. आनंदराव पाटील दिवसभर कराड बनपुरी कॉलनीतील आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी सकाळी विजयनगर येथील ग्रामदैवत व प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालय येथे दिवंगत आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करणार आहेत. त्यानंतर कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी अभिवादन करणार आहेत. नंतर दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हितचिंतकांनी येताना हारतुरे, पुष्पगुच्छ आणू नये. त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य, वह्या, पुस्तके आदी साहित्य आणावे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना देता येईल, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंढे (ता. कराड) येथील शहीद जवान दिवंगत संदीप सावंत यांच्या स्मरणार्थ गावात कमान उभारण्यात येणार आहे. या कामासाठी आनंदराव पाटील यांच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. कराड तालुक्यातील ग्रामपंचायतींना सॅनिटायझर मशीन, पीपीई किट, थर्मामीटर, मास्क, ऑक्सिमीटर व मास्क वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात येणार आहे.

(वा प्र )

फोटो :17 आनंदराव पाटील 01

Web Title: Various activities on the occasion of Anandrao Patil's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.