वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेजचे विविध स्पर्धांत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:20+5:302021-04-08T04:40:20+5:30

फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेज प्रथम व द्वितीय वर्ष औषधनिर्माण पदविका ...

Venutai Chavan Pharmacy College's success in various competitions | वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेजचे विविध स्पर्धांत यश

वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेजचे विविध स्पर्धांत यश

Next

फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेज प्रथम व द्वितीय वर्ष औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमातील (डी. फार्मसी) विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन केले आहे.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील फार्मसी महाविद्यालयांच्यावतीने पोस्टर प्रेझेंटेशन, कोविड १९ जागरुकता या स्पर्धांचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, कोविड १९ जागरुकता या विषयांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, (ई-कॉमिक स्पर्धा), स्पर्धा प्रश्न चाचणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये विविध जिल्ह्यांसह काही परराज्यातील फार्मसीच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धांमध्ये सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी महाविद्यालय, फलटण येथील द्वितीय वर्षात शिकत असलेला विद्यार्थी शुभम संदीप कोरडे याने उल्लेखनीय कामगिरी करून राज्यस्तरावर प्रथम कमांकाची ३, द्वितीय कमांकाचे १ व राष्ट्रीयस्तरावरील तृतीय कमांकाचे १ अशी एकूण ५ पारितोषिके पटकावून सर्व विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

द्वितीय वर्षातील अर्चना उदयसिंग बांदल हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम कमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. प्रथम वर्षातील नवख्या विद्यार्थ्यांनीही यशाची परंपरा कायम राखण्यात मोलाची कामगिरी बजावली असून, यामध्ये समृध्दी विजय भगत व संचिता हनुमंत गवळी या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय व्यंगचित्र स्पर्धेत प्रथम कमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), प्राचार्य मनोज फडतरे व पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

( वा. प्र. )

(फोटो विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ. सचिन बेडके, प्राचार्य मनोज फडतरे.)

Web Title: Venutai Chavan Pharmacy College's success in various competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.