ही वाट नभात जाते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:07+5:302021-02-05T09:07:07+5:30

काळजाचा थरकाप उडविणाऱ्या दऱ्या महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंटवर गेल्यानंतर तेथील निसर्गाचा अद्भूत नजराणा ...

The wait is over ...! | ही वाट नभात जाते...!

ही वाट नभात जाते...!

Next

काळजाचा थरकाप उडविणाऱ्या दऱ्या महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंटवर गेल्यानंतर तेथील निसर्गाचा अद्भूत नजराणा पाहिल्यानंतर ही वाट आकाशात तर जात नाही ना असा आभास होत आहे. (छाया : सचिन काकडे)

३१महाबळेश्वर-लॉडविक पॉईंट

०००००००००

काटेरी झुडपांची वाढ

सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काटेरी झुडपांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विशेषत: खटाव तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यावर हे प्रमाण जास्त असल्याने वाहने चालविणे अवघड जात आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

०००००००००

पहाटे थंडी दुपारी ऊन

कुडाळ : कुडाळसह भागात दोन-तीन दिवसांपासून पहाटेची चांगलीच थंडी पडत आहे. त्यामुळे सकाळपर्यंत गारठा जाणवत आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत आहे. थंडी आणि ऊन यामुळे वातावरण बदलले असून आता उन्हाळ्याची चाहूल लागल्यासारखे जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र थंडीची लाट ओसरली होती.

००००००

पुन्हा शाळा गजबजल्या

सातारा : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोमवार, दि. १ पासून सुरू करणार आहेत. त्यासाठी शाळांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

००००००००

जनजागृती बिनकामी

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. तरीही प्रवाशांकडून दुर्लक्ष केले जात आहे. अगदी महाविद्यालयीन तरुण-तरुणीही विनामास्क प्रवास करत असतात हे इतरांसाठी धोक्याचे आहे.

००००००

डीपी बॉक्स उघडे

म्हसवड : माण तालुक्यातील अनेक गावांमधील वीज वितरण कंपनीच्या विद्युत ट्रान्सफार्रमचे दरवाजे गायब झाले आहेत. हे ट्रान्सफार्मर मानवी वस्तीत असून, लहान मुलं तेथेच खेळत असतात. त्यामुळे हे उघडे विद्युत ट्रान्सफार्मर जीवघेणे ठरू शकतात. त्यांना तातडीने दरवाजे बसविण्याची मागणी होत आहे.

००००००००

निर्जंतुक फवारणी करण्याची गरज

सातारा : कोरोनाचा फैलाव झाला त्या वेळेस साताऱ्यातील बहुतांश वसाहतींमधील रहिवासी एकत्र येऊन इमारत स्वच्छता करत असत. रसायनांचा वापर करुन निर्जंतुकीकरण केले जात होते. पण आता सर्वजण कामाला लागले असल्याने याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हा दिनक्रम पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

०००००००००००००

०००००००००००

उभा फोटो

२५जावेद१४

कोणाला चिंता... कोण बिनधास्त...!

राज्य परिवहन महामंडळाचा सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्याची काहीजण अंमलबजावणी करतातही पण काहींना त्याची काहीच फिकीर नसल्याचे जाणवत आहे. (छाया : जावेद खान)

---------

मैदाने बंदच राहणार

सातारा : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असले तरी मैदाने बंद राहणार आहेत. मुलं एकत्र खेळली तर सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही. त्यामुळे काही शाळा व्यवस्थापनाने आणखी काही दिवस खेळ बंद ठेवण्याचा विचार करत आहे. त्याचा मुलांच्या सरावावर परिणाम होणार आहे.

००००००००

कचऱ्यामुळे डोकेदुखी

शिरवळ : शिरवळसह परिसरात नागरिक उघड्यावर कचरा टाकत असतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जिल्ह्याच्या काही भागांत साथीचे आजार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून संबंधित विभागाने उघड्यावरील कचरा उचलून न्यावा. तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

०००००००००

घंटागाडी अनियमित

सातारा : सातारा पालिका हद्दीत घंटागाड्या नियमित जात असते. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होते. मात्र या हद्दीला चिटकूनच असलेल्या काही भागात घंटागाडी अनियमितपणे येत असते. त्यामुळे अनेक दिवस कचरा साठूनच राहत असतो. त्यामुळे घंटागाडी नियमित करण्याची मागणी होत आहे.

०००००

ऊसवाहतूक धोक्याची

कोरेगाव : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र ट्रॅक्टरला दोन, तीन ट्रॉली जोडली जाते. ही ट्रॉली रस्ते खराब असल्याने सतत हेलकावे खात असल्याने इतर वाहनांना धोक्याचे ठरत आहे.

००००००००००

झाडांची रंगरंगोटी

सातारा : कोरोना काळात अनेकजण घरीच बसून होते. त्या काळात परिसरातील झाडांची रंगरंगोटी करण्यास सुरुवात केली होती. यामुळे साताऱ्यातील संबंधित परिसर आता खुलून दिसत आहे. त्यामुळे एक चांगला अनुभव नागरिकांना येत आहे.

०००००

ग्रामीण रस्त्याच्या चढावर दगडांचा खच

सातारा : जिल्ह्यात ऊस हंगाम तेजीत असल्याने सर्वच भागांत ऊस वाहतूक ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. ग्रामीण भागात एका वेळी दोन-तीन ट्रॉली जोडल्या जातात. चढावर ऊस वाहतूक करणे अवघड जाते. ट्रॅक्टरचालकांचे हाल होतात. ट्रॉली मागे जाऊ नये म्हणून टायरला दगडे लावले जातात. ठराविक अंतरावर तसेच करावे लागते. त्यामुळे ट्रॅक्टर चढ चढतो, पण दगडे न उचलताच ते निघून जातात.

Web Title: The wait is over ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.