कोयनेतील पाणीसाठा अर्धशतकाकडे, पश्चिम भागात उघडझाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:02 PM2019-07-19T12:02:58+5:302019-07-19T12:04:28+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ४९.३९ टीमएसी साठा झाला होता. तर इतर धरणातीलही पाणीसाठा वाढत असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात १०.३२ तर २४ तासांत सरासरी ०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

 Water in the Koyna half-century, in the western part, Snap | कोयनेतील पाणीसाठा अर्धशतकाकडे, पश्चिम भागात उघडझाप

कोयनेतील पाणीसाठा अर्धशतकाकडे, पश्चिम भागात उघडझाप

googlenewsNext
ठळक मुद्दे कोयनेतील पाणीसाठा अर्धशतकाकडे, पश्चिम भागात उघडझापसातारा जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ०.८७ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून, कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ४९.३९ टीमएसी साठा झाला होता. तर इतर धरणातीलही पाणीसाठा वाढत असून, बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात १०.३२ तर २४ तासांत सरासरी ०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर दोन-तीन दिवस उघडीप मिळाली; पण आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. सध्या कमी-अधिक फरकाने पाऊस पडत आहे. कोयना आणि नवजा येथे चांगला पाऊस झाला. तर महाबळेश्वरला उघडीप असल्याचे दिसून आले. पूर्व भागात मात्र पावसाने चांगलीच दडी मारली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा ० (६१८.६८), जावळी ०.३३ (७२७.४८), पाटण ५.०९ (६३९.४८), कºहाड ० (२८३.१५), कोरेगाव ० (२४३.८९), खटाव ० (१४३.२५), माण ०.५७ (७८.४१), फलटण ० (७५.११), खंडाळा ० (१७३.२५), वाई ० (२५३.७०), महाबळेश्वर २.३३ (२३३५.३८) याप्रमाणे आजपर्यंत एकूण ५५७१.७८ तर सरासरी ४२८.८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणक्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना ५१ (२१७४), नवजा ५५ (२४००) आणि महाबळेश्वर २ (२०९०).

प्रमुख धरणांतील पाणीसाठा

गुरुवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व टक्केवारी कंसात अशी आहे. धोम - ३.०३ (२५.८८), धोम-बलकवडी- २.०१ (५०.८३), कण्हेर- ५.१७ (५३.८९), उरमोडी- ३.९६ (४१.००), तारळी- ४.१९ (७१.६४), नीरा-देवघर ५.४२ (४६.२२), भाटघर- १०.८४ (४६.१४), वीर - ६.५४ (६९.५२).

Web Title:  Water in the Koyna half-century, in the western part, Snap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.