प्रत्येक गावात पाणी योजना तरीही वणवण- टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:00 AM2019-05-17T00:00:26+5:302019-05-17T00:02:36+5:30

सूर्यकांत निंबाळकर । आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, ...

Water planning in every village still increases the intensity of the waste | प्रत्येक गावात पाणी योजना तरीही वणवण- टंचाईची तीव्रता वाढली

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, फलटण तालुक्यातील आदर्की मंडलात येणाऱ्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.

Next
ठळक मुद्दे: आदर्की मंडलातील दहा गावांमधील ग्रामस्थांची पायपीट सुरूच--खोल-खोल पाणी !

सूर्यकांत निंबाळकर ।
आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, कारण आदर्की मंडलातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या चार ते पाच पाणीपुरवठा योजना असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण पश्चिम भागातील आदर्की मंडलात दहा ते एकरा गावे येतात. या गावात जिल्हा परिषद, आमदार, खासदार, जिल्हा परिषद व अन्य निधीतून पाणीपुरवठा योजना राबवताना भूजलपातळीचा विचार न करता सर्व्हे, विहिरीचे खोदकाम ओढ्याकडेला केले आहे.

ठेकेदाराने विहिरीचे काम पाण्याअभावी खोलीकरण केले नाही, त्यामुळे पाणीसाठा होत नाही. पावसाळ्यात ओढ्याला पाणी असते, त्यामुळे पाणी टंचाई भासत नाही. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून बिले काढतात. प्रत्येक टंचाई काळात नवीन पाणीपुरवठा योजना राबवतात; मात्र जुन्या तशाच पडून राहतात.

आदर्की खुर्द येथे दुरुस्तीसाठी खासदार फंडातून स्वंतत्र पाणीपुरवठा टाकी यावर लाखो रुपये खर्च केले, त्याच दुरुस्तीसाठी पेयजल योजनेतून बिचकुले वस्तीसाठी दुसरी पाणीपुरवठा योजना राबवली. बिचकुले वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवली आहे.

दोन विहिरी आहेत; परंतु दुरुस्तीसाठी हातपंपावर मोटर बसवली आहे.
काकडे वस्तीसाठी जुन्या आडाचे रुंदीकरण केले व स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून नळ पाणीपुरवठा योजना राबवली आहे, तीही बंद आहे. त्यानंतर दुसरी गावातील विहिरीवरून पाईपलाईन करून पाण्याची उपसा केली. वरील सर्व योजना बंद आहेत. पाच वर्षांपूर्वी पेयजेल योजनेतून अंदाजे ७२ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना राबवताना स्वतंत्र विहीर खोदली, तीही पहिल्या योजनेच्या विहिरींपासून केवळ दहा मीटर अंतरावर ओढ्यातच. त्यामुळे आता दोन्ही विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

आदर्की बुद्रुकमधील शिंदे मळ्यातील पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली म्हणून २००४ मध्ये आदर्की खुर्द येथे विहीर खोदून चार किलोमीटर पाईपलाईन योजना सुरू केली. आता ती बंद असून, विहीर व पाईपलाईन तशीच व दुसरी लोकवर्गणीतून हिंगणगाव धरणात विहीर खोदून दुसरी योजना राबवली आहे. बिबी येथे २००४ मध्ये पाणी टंचाई काळात घाडगेवाडी येथून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी लाखो रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे बिबी गावास नेले. त्यानंतर धोम-बलकवडी कालव्याला आले. बिबीत पाणी टंचाई दूर झाली. लाखो रुपये खर्चून केलेली पाईपलाईन तशीच आहे. या गावात शासनाकडून विहीर अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे.


कालव्याशेजारील गावाला टँकरने पाणी..
घाडगेवाडी येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुळीकवाडी धरणाखाली विहीर खोदूनही पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर आज घाडगेवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सासवड येथे अनेक पाणीपुरवठा योजना लाखो रुपये खर्चून पूर्ण केल्या. गतवर्षी मुळीकवाडी धरणातून पाणी आणले; पण यावर्षी धरणच आटले. आता गावाला नीरा उजवा कालव्याशेजारी गावाला पाणी पुरवठा केला जातो तर वाडी-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.


आदर्की मंडलात पाणी योजनेद्वारे पाणी विहिरीत सोडले जाते. त्यामुळे वृद्धांना अशा प्रकारे सायकलवरून पाणी आणावे लागत आहे.
 

सार्वजनिक विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडले जाते; पण पिण्यासाठी पाणी सायकलवरून बाहेरून आणावे लागते. ही पायपीट कधी थांबणार.
- आनंदराव सापते, घाडगेवाडी, ता. फलटण

 

Web Title: Water planning in every village still increases the intensity of the waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.