‘धरणीमाता’कडून रोपांना टँकरद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:21+5:302021-05-16T04:38:21+5:30
कुंभारगाव विभागातील गलमेवाडी येथे धरणीमाता फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य असणाऱ्या युवकांनी टँकरद्वारे झाडांना पाणी घालण्याचे काम केल्याने रोपांना जीवदान ...
कुंभारगाव विभागातील गलमेवाडी येथे धरणीमाता फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य असणाऱ्या युवकांनी टँकरद्वारे झाडांना पाणी घालण्याचे काम केल्याने रोपांना जीवदान मिळाले आहे. या विभागात धरणीमाता फाउंडेशनकडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. काही दिवसांपूर्वीच फाउंडेशनच्या वतीने पक्षांसाठी पाण्याची व खाद्याची सोय करण्यात आली होती. विभागातील बहुतांश झाडांवर त्यांनी जलपात्राची सोय केली होती. त्याद्वारे पक्ष्यांची तहान भागविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. सध्या वाढती उष्णता लक्षात घेऊन झाडे जगविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. उन्हाच्या तडाख्यात होरपळणाऱ्या वृक्षांना व लहान रोपांना टँकरद्वारे त्यांच्याकडून पाणीपुरवठा केला जात आहे.
तालुक्यात डोंगरांना वणवे लावले जात असल्याने अनेक ठिकाणी झाडे होरपळली आहेत. नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे विभागात असणारी झाडे जगविण्यासाठी फाउंडेशनमार्फत प्रयत्न सुरू आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत या झाडांची आम्ही देखभाल करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश वाघ यांनी सांगितले.
फोटो : १५ केआरडी ०४
कॅप्शन : पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागात धरणीमाता फाउंडेशनकडून टँकरद्वारे झाडांना पाणी घालण्याचे काम केले जात आहे.