मलकापुरात योजनेच्या कामामुळे आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:39 AM2021-02-24T04:39:45+5:302021-02-24T04:39:45+5:30

मलकापूर : येथील नगरपालिकेच्या २४ तास नळपाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम मंगळवार, दि. २३ फेब्रुवारीपासून सुरू केले आहे. त्यामुळे ...

Water supply at low pressure for eight days due to scheme work in Malkapur | मलकापुरात योजनेच्या कामामुळे आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

मलकापुरात योजनेच्या कामामुळे आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

Next

मलकापूर : येथील नगरपालिकेच्या २४ तास नळपाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत दुरुस्तीचे काम मंगळवार, दि. २३ फेब्रुवारीपासून सुरू केले आहे. त्यामुळे पुढे दहा ते बारा दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी केले आहे.

मुख्याधिकारी मर्ढेकर म्हणाले, नळपाणीपुरवठा योजनेतील सेटलिंग टँकमधीलअंतर्गत दुरुस्तीची कामे व स्वच्छता दरवर्षी करण्यात येते. हे काम रात्रंदिवस चालणार आहे. या कामासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो. दुरुस्ती कामाच्या कालावधीमध्ये फिल्टर बेडमधून घेतलेल्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया शहरामध्ये पाणीपुरवठा कमी जास्त दाबाने होणार आहे.

या कालावधीमध्ये पाणीपुरवठा काळजीपूर्वक काटकसरीने वापरावा, असे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे व दररोज नियमितपणे आरोग्याच्या आनुषंगाने काळजीपूर्वक पाणी उकळून प्यावे. तरी नागरिकांनी सदर कालावधीमध्ये सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Water supply at low pressure for eight days due to scheme work in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.