कुमार शिंदेंनी चार वर्षांत काय विकास केला : अफजल सुतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:00+5:302021-06-09T04:48:00+5:30

महाबळेश्वर : ‘विरोधकांमुळे शहराच्या विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप करणाऱ्या कुमार शिंदे यांची कीव येते, असे आरोप करण्यापूर्वी त्यांनी आत्मपरीक्षण ...

What did Kumar Shinde develop in four years: Afzal Sutar | कुमार शिंदेंनी चार वर्षांत काय विकास केला : अफजल सुतार

कुमार शिंदेंनी चार वर्षांत काय विकास केला : अफजल सुतार

Next

महाबळेश्वर : ‘विरोधकांमुळे शहराच्या विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप करणाऱ्या कुमार शिंदे यांची कीव येते, असे आरोप करण्यापूर्वी त्यांनी आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते. मागील चार वर्षांत शहराचा कोणता विकास केला,’ असा प्रश्न उपनगराध्यक्ष अफजल सुतार नगरसेवक कुमार शिंदे यांना उपस्थित केला.

पालिकेच्या मागील दोन सर्वसाधारण सभांना सतरापैकी चौदा नगरसेवकांनी दांडी मारल्याने नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी उपनगराध्यक्ष व त्यांच्या गटातील नगरसेवकांवर विकासकामे रोखल्याचा आरोप केला. या आरोपांना उत्तर देण्यासाठी विरोधी गटातील नगरसेवकांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

अफजल सुतार म्हणाले, ‘नगराध्यक्षा व त्यांचे पती यांनी सहकारी नगरसेवकांना कधी विश्वासात घेतले नाही. कायम मनमानी कारभार केला. सर्वसाधारण सभेपूर्वी सहकारी नगरसेवक आपल्या प्रभागातील विकास कामांची यादी नगराध्यक्षांना देत असे, परंतु ते विषय कधीच नगराध्यक्षा व त्यांचे पती कुमार शिंदे यांनी विषयपत्रिकेत घेतले नाही. सहकारी नगरसेवकांच्या कामांना बगल देऊन स्वतःच्या फायद्याचे विषय फक्त घेतले जात होते. आमच्यावर विकासकामे रोखून धरल्याचा आरोप करणाऱ्यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे.

चौकट

नवा मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष

कुमार शिंदे यांनी बडबड बंद करावी, अन्यथा चार वर्षांत जो कारभार केला आहे त्याची श्वेतपत्रिका काढून भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला जाईल, असा इशाराही या तेरा नगरसेवकांनी दिला आहे. यापूर्वीच्या मुख्याधिकारी नगराध्यक्षांच्या नियमबाह्य व बेकायदशीर कामाला पाठिंबा देत होत्या. परंतु सध्या पालिकेत नव्याने रूजू झालेल्या मुख्याधिकारी या कर्तव्यदक्ष आहेत. कायद्याच्या चाकोरीबाहेर जाऊन काम करण्यास त्यांचा विरोध असतो. मुख्याधिकारी यांच्या या भूमिकेमुळे नगराध्यक्षांची आवक थंडावली आहे. त्यामुळे कुमार शिंदे यांचा यांचा तोल गेला आहे.

Web Title: What did Kumar Shinde develop in four years: Afzal Sutar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.