अगदी सुरुवातीला मोबाइल बोलताना पडला तर नुकसान होऊ नये म्हणून बाजारात लेस मिळत असायच्या. मोबाइलच्या कोपऱ्यात दोन छिद्र असायच्या त्यांना लेस बांधून गळ्यात अडकवला जायचा. फोनवर बोलून झाल्यानंतर तो खिशात ठेवला जायचा. त्यानंतर सुधारणा झाली अन् कंबरपट्ट्याला अडकविण्यासाठी मोबाइलच्या आकाराचे चामडी पाकीट येऊ लागले. कामापुरताच मोबाइल काढला जायचा अन् परत बेल्टला लावून ठेवला जायचा. पण असा पाऊच वापरणे म्हणेज समाजात वेगळाच मान असायचा. साऱ्यांचं लक्ष हा पाऊच वेधून घेत होता.
पुरुष, तरुण मोबाइल वापर ते खिशात, पाऊचमध्ये ठेवण्यासाठी सोय होती. पण कालांतराने तरुणीही मोबाइल वापरू लागल्या. पण त्यांच्या ड्रेसला खिसा नसल्याने अडचण यायची. यावर तत्कालीन बाजारपेठेने प्रश्न सोडविला. लोकरी, विविध कलाकुसरांचा वापर केलेले मोबाइलच्या आकाराो पाकीट बाजारात आले. त्याची लेस मात्र भलतीच लांब असायची. गळ्यात अडकविल्यानंतर मोबाइल कंबरेपर्यंत येत असत. हे पाऊच घेतानाही तरुणी ड्रेसला शोभेल असाच घेत असत.
मोबाइलची गरज म्हणून या वस्तू लोक खरेदी करत पण काही वस्तू शोभेसाठी बाजारात येत असत. त्यामुळे मोबाइलचं सौदर्य खुलून दिसत असत. यामध्ये मुलींना पसतीस पडतील अशा कि-चेन सारख्या हॅण्डल लावलायला मिळत. त्यांना काही कार्टून लावलेले असायचे. त्यांच्यावर असलेले स्टोन कॉल आल्यानंतर चमकायला लागायचे. त्यांना कसलेही वीज जोडलेली नसताना लेस, कार्टूनवरील पांढरे खडे चमकत असायचे.
खेकडा चार्जर
चला हवा येऊ द्या... मुळे गोल पिनचे चार्जर चांगलाच चर्चेत आले होते. पण दरम्यानच्या काळात चिनी बनावटीचे मोबाइल बाजारात आले. त्यांची बॅटरी लवकरच डाऊन होत असायची. त्यामुळे या मोबाईलधारकांना दोन-दोन बॅटरी सांभाळाव्या लागत असत. त्या बॅटऱ्यांसाठी वापरला जात असलेला चार्जर गमतीशील असायचा. त्याच्या तोंडात बॅटरी ठेवायला लागायची. त्यामुळे त्यांना खेकडा चार्जर म्हटले जात.
- जगदीश कोष्टी
फोटो
प्रूफ/१३संडे स्पेशल/मोबाईल०१, ०२