सलाइनच्या बाटल्यांआडून दारूचा प्रवास

By Admin | Published: March 17, 2015 11:00 PM2015-03-17T23:00:52+5:302015-03-18T00:06:48+5:30

दोन ट्रक जप्त : तिघांना अटक करून विदेशी मद्याचे १००४ बॉक्स ताब्यात

Wine travel by saline bottles | सलाइनच्या बाटल्यांआडून दारूचा प्रवास

सलाइनच्या बाटल्यांआडून दारूचा प्रवास

googlenewsNext

सातारा : कऱ्हाडनजीक भुयाची वाडी आणि शिवडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून चोरट्या दारूचे दोन ट्रक पकडले. या कारवाईत विदेशी मद्याचे तब्बल १००४ बॉक्स जप्त करण्यात आले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. सलाइनच्या बाटल्यांमागे दडवून या दारूची वाहतूक करण्यात येत होती. दोन्ही वाहनांसह ६० लाख ६० हजार ८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेली दारू गोवा बनावटीची आहे. राज्य उत्पादन शुल्क सातारा विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे भरारी पथक आणि पाटणच्या उपनिरीक्षकांनी ही कारवाई केली. कऱ्हाड ते सातारा मार्गावर दोन आयशर ट्रक (एमएच २३ डब्ल्यू ९१८ आणि एमएच ४३ ई ८१५९) जप्त करण्यात आले. रामदास महादेव डांगे (रा. नेले, ता. सातारा), बबलू कुमार यादव (रा. हाजीगडी, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) आणि बन्सराज श्रीहरीराम भारती (रा. देवरा, जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश) या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चोरट्या मद्याची वाहतूक गोव्याकडून पनवेल-मुंबई आणि औरंगाबादकडे केली जात होती, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्रत्येक ट्रकमध्ये दोन चालक असावेत आणि त्यातील एक पळून गेला असावा, असा कयास आहे.दारूची वाहतूक करण्यासाठी एका ट्रकच्या मागील भागात सलाइनच्या बाटल्या रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामागे दारूचे बॉक्स लपविण्यात आले होते. दुसऱ्या ट्रकच्या मागील बाजूस प्लास्टिकचे चघळ आणि चिंंध्या असलेली गाठोडी आढळून आली. त्यामागे दारूचे बॉक्स ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)

ट्रकच्या
आत चोरकप्पे
चोरटी दारू लपविण्यासाठी प्लास्टिक चघळ आणि सलाइनच्या बाटल्यांचा आडोसा तर करण्यात आलाच होता; शिवाय या दोन्ही ट्रकमध्ये आतील बाजूस चोरकप्पे तयार केल्याचे आढळून आले. या कप्प्यांवरील झाकण नट-बोल्टने बसविण्यात आले होते. नट उघडताच चोरकप्पा उघडेल, अशी रचना होती. एका ट्रकच्या चोरकप्प्यात ८० बॉक्स तर दुसऱ्या ट्रकच्या चोरकप्प्यात १२४ बॉक्स आढळून आले.

Web Title: Wine travel by saline bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.