महाबळेश्वरच्या बाजारपेठेवरील निर्बंध मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:30+5:302021-07-07T04:49:30+5:30

महाबळेश्वर : लॉकडाऊनमुळे बाजारपेठेवर असलेले निर्बंध मागे घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी संगीता राजापूरकर तसेच ...

Withdraw restrictions on Mahabaleshwar market | महाबळेश्वरच्या बाजारपेठेवरील निर्बंध मागे घ्या

महाबळेश्वरच्या बाजारपेठेवरील निर्बंध मागे घ्या

Next

महाबळेश्वर : लॉकडाऊनमुळे बाजारपेठेवर असलेले निर्बंध मागे घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी संगीता राजापूरकर तसेच पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील व नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांची भेट घेतली. तसेच यावेळी मागण्यांचे निवेदन संबंधितांना देण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांत तीव्र नाराजी पसरलीय. त्यातच महाबळेश्वर तालुक्याचा रुग्णवाढीचा दर सर्वात कमी आहे. असे असतानाही इतर तालुक्यांतील रुग्णवाढीचा फटका महाबळेश्वरला बसत आहे.

महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ आहे. येथे पर्यटक येऊ लागलेत. पर्यटक आपली कोरोना चाचणी करूनच येत आहे. त्याचबरोबर तपासणी केल्याचे प्रमाणपत्र पाहूनच त्यांना महाबळेश्वर येथील हॉटेल व लॉजमध्ये प्रवेश दिला जातोय. यामुळे मागील १० दिवसांत हजारो पर्यटक येऊनही महाबळेश्वरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. या सर्व बाबींचा जिल्हा प्रशासनाने विचार करून बाजारपेठेवरील निर्बंध हटवावेत. बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे.

उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली तर माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची भेट घेतली. या वेळी उपनगराध्यक्ष सुतार यांनी शहरातील व्यापारीवर्गाच्या व्यथा मांडल्या. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, नगरसेवक किसनराव शिंदे, प्रकाश पाटील, संदीप साळुंखे, रवींद्र कुंभारदरे, विशाल तोष्णीवाल, अतुल सलागरे, महेश कोमटी, इरफान शेख, असिफ सय्यद, तौफिक पटवेकर, महेश गुजर, मनोज ताथवडेकर, बाळकृष्ण साळुंखे, अभिजित खुरासणे, सचिन वागदरे, रामदास जाधव, संतोष जंगम आदी उपस्थित होते.

...................................................................

Web Title: Withdraw restrictions on Mahabaleshwar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.