खटावमधील यात्रा साध्यापद्धतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:05+5:302021-05-05T05:04:05+5:30
खटाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे पालन करत खटावमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा सुरू झाली असली, तरी ...
खटाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे पालन करत खटावमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा सुरू झाली असली, तरी ती साधेपणाने व भविकांविना मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरी केली जात आहे.
चैत्र शुद्ध अष्टमी सोमवार, दि. ३ रोजी भैरवनाथ जोगेश्वरीचा हळद व विवाह सोहळा पारंपरिक व विधीवत पद्धतीने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी फक्त देवळाचे पूजाविधी करणारे गुरव तसेच सरपंच, उपसरपंच व मोजक्याच सदस्यांच्या उपस्थित ही यात्रा पार पडली आहे.
खटावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असे देवाला साकडे घालून उपसरपंच अमर देशमुख यांच्याहस्ते श्री भैरवनाथ देवाला महारुद्राभिषेक करण्यात आला. शेवटी महाआरती करण्यात आली.
कॅप्शन :
खटावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरीची विधीवत पूजा उपसरपंच अमर देशमुख व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली. (छाया : नम्रता भोसले)