तुला सांगतो; कुणाला सांगू नको ! उदयनराजेंची पालिकेत भेट : मुख्याधिकाऱ्यांशी कमराबंद चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:39 PM2018-12-29T23:39:01+5:302018-12-29T23:41:10+5:30

येथील पालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता सातारा नगरपरिषदेत पदाधिकाºयांच्या गैरहजेरीत अचानक भेट

You say Do not tell anyone! Visit to Udayanaraja: Discussion with the Chief Officer | तुला सांगतो; कुणाला सांगू नको ! उदयनराजेंची पालिकेत भेट : मुख्याधिकाऱ्यांशी कमराबंद चर्चा

प्रत्येकाला काय सांगावे अन् काय सांगू नये, याबाबत खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चौकस असतात. पालिका पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर अनेकांची फिल्डिंग लावणे सुरू असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेव, असं तर उदयनराजे या पालिका कर्मचाºयाला सांगत नसतील ना ?

googlenewsNext

सातारा : येथील पालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी दीड वाजता सातारा नगरपरिषदेत पदाधिकाºयांच्या गैरहजेरीत अचानक भेट दिली. त्यांची मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनात सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी कर्मचाºयाशी संवाद साधला.

सातारा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीतील अनेक नगरसेवक सभापतिपदी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न आहेत. त्याबाबत शहरातमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी अचानक पालिकेत एंट्री केली.

पालिकेत दुपारच्या वेळी उदयनराजेंनी भेट दिल्याने अधिकारी व कर्मचाºयांची धावपळ उडाली. उदयनराजे यांनी थेट मुख्याधिकाºयांच्या दालनात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व साविआचे नगरसेवक यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.चर्चा झाल्यानंतर उदनराजे यांनी पालिकेतील शिपाईला बाजू घेऊन त्याची विचारपूस केली. तसेच पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाºयांच्या हालचालांवर लक्ष ठेवण्याचा कानमंत्र देऊन निघून गेले.
 

 

Web Title: You say Do not tell anyone! Visit to Udayanaraja: Discussion with the Chief Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.