जर्मनीचे तरुण भारतभर फिरले..पैशाची चणचण भासताच ‘गांजा’ शेतकरी बनले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:47 AM2021-02-20T05:47:37+5:302021-02-20T05:47:37+5:30

सातारा : ३५ देश फिरल्यानंतर छत्तीसवा देश फिरण्यासाठी दोघे जर्मनीहून भारतात आले. घरातून आई पैसे देत होती. या पैशावरच ...

Young people from Germany traveled all over India. | जर्मनीचे तरुण भारतभर फिरले..पैशाची चणचण भासताच ‘गांजा’ शेतकरी बनले !

जर्मनीचे तरुण भारतभर फिरले..पैशाची चणचण भासताच ‘गांजा’ शेतकरी बनले !

Next

सातारा : ३५ देश फिरल्यानंतर छत्तीसवा देश फिरण्यासाठी दोघे जर्मनीहून भारतात आले. घरातून आई पैसे देत होती. या पैशावरच हे दोघे मित्र भारतभर हिंडत होते. मात्र, पैशांची चणचण भासू लागल्यानंतर जर्मनच्या दोघा मित्रांनी शाॅर्टकट मारून घरातच गाजांची शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात उघड झाले.

सर्गीस व्हिक्टर मानका (वय ३४), सेबेस्टियन स्टेन मूलक (वय २५) अशी जर्मन मित्रांची नावं आहेत. या दोघांनी वाइमधील एका रो-हाऊसमध्ये गांजाची शेती केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सर्गीस मानका याची घरची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. तो आत्तापर्यंत तब्बल ३५ देश फिरला आहे. वयाच्या वीस वर्षांपासून तो पर्यटनाच्या निमित्ताने देशभर फिरत आहे. भारतात येताना मात्र, त्याचा मित्र सेबेस्टियनला तो सोबत घेऊन आला. या दोघांनी येताना केवळ तीन महिन्यांचा पर्यटन व्हिजा काढला होता. त्यानंतर ते परत जाणार होते. मात्र, गोव्यात राहत असताना त्यांनी तेथेही गांजांची शेती केली. यात त्यांना अटक झाली. दोघांचेही पासपोर्ट जप्त करण्यात आले. या खटल्याचा निकाल पूर्ण होईपर्यंत त्यांना भारतातून जर्मनीला जाता येणार नाही. या दोघांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी गोव्यातून थेट वाइमध्ये बस्तान बसविले. एका स्थानिकाच्या मदतीने त्यांना भाड्याने रो-हाउस मिळाला. विशष म्हणजे या रो-हाउसचे भाडे महिन्याला पंधरा हजार रुपये होेते. काहीही कामधंदा न करता हे दोघे भाडे देत होते. जर्मनीहून येताना सर्गेस याने आईचे एटीएम आणले होते. या एटीएमद्वारे तो जर्मनीशी संलग्न असणाऱ्या बॅंकेतून तो पैसे काढत होता. मात्र, तरीही त्यांना पैशाची चणचण भासायची. यातूनच त्यांनी पुन्हा गोव्यातील गाजांच्या शेतीचा डाव वाईत आखला.

चाैकट : जर्मनीला परत जाण्याची आशा धूसर

गाजांची शेती करणे व गांजा जवळ बाळगणे हा गुन्हा असून, हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर २० वर्षे ते जन्मठेपेपर्यंत कायद्यात तरतूद आहे. या जर्मन युवकांवर अशाप्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे सिद्ध झाल्यास परत जर्मनीला जाण्याची आशा त्यांची धूसर होईल.

चाैकट : दोघांचेही स्वभाव अत्यंत आक्रमक

सर्गीस आणि सेबेस्टिनयन या दोघांचे स्वभाव अत्यंत आक्रमक आहे. पोलिसांच्या चाैकशीदरम्यान त्यांना वारंवार प्रश्न केल्यानंतर दोघेही पोलिसांशी चिडून बोलत तसेच इंग्रजीमधून शिवीगाळ करत होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही ते बोट दाखवून तुला मी ठार मारेन, अशी धमकी द्यायचे. त्यांच्या शरीरात गांजाचा अंमल असल्यामुळे कदाचित त्यांची वर्तवणूक अशी, असावी.

चाैकट : एक वर्षे सैन्यदलात नोकरी

सर्गीस याने जर्मनीच्या सैन्यात एक वर्षे नोकरी केली आहे. त्यानंतर त्याने ही नोकरी सोडून जगभर फिरण्याचा चंग बांधला. अत्यंत कमी वयामध्ये त्याने तब्बल ३५ देशांमध्ये पर्यटन केले आहे.

Web Title: Young people from Germany traveled all over India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.