जर्मनीचे तरूण भारतभर फिरले..पैशाची चणचण भासताच गांजा शेतकरी बनले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 10:59 AM2021-02-19T10:59:46+5:302021-02-19T11:03:54+5:30
CrimeNews Satara- पस्तीस देश फिरल्यानंतर छत्तीसवा देश फिरण्यासाठी दोघे जर्मनीहून भारतात आले. घरातून आइ पैसे देत होती. या पैशावरच हे दोघे मित्र भारतभर हिंडत होते. मात्र, पैशांची चणचण भासू लागल्यानंतर जर्मनच्या दोघा मित्रांनी शॉर्टकट मारून घरातच गाजांची शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात उघड झाले.
सातारा: पस्तीस देश फिरल्यानंतर छत्तीसवा देश फिरण्यासाठी दोघे जर्मनीहून भारतात आले. घरातून आइ पैसे देत होती. या पैशावरच हे दोघे मित्र भारतभर हिंडत होते. मात्र, पैशांची चणचण भासू लागल्यानंतर जर्मनच्या दोघा मित्रांनी शॉर्टकट मारून घरातच गाजांची शेती करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात उघड झाले.
सर्गीस व्हिक्टर मानका (वय ३४), सेबेस्टियन स्टेन मूलक (वय २५) अशी जर्मन मित्रांची नाव आहेत. या दोघांनी वाइमधील एका रो हाऊसमध्ये गांजाची शेती केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
सर्गीस मानका याची घरची आथिक परिसैथिती उत्तम आहे. तो आत्तापर्यंत तब्बल पस्तीस देश फिरला आहे. वयाच्या वीस वर्षांपासून तो पर्यटनाच्या निमित्ताने देशभर फिरत आहे. भारतात येताना मात्र, त्याचा मित्र सेबेस्टियनला तो सोबत घेऊन आला. या दोघांनी येताना केवळ तीन महिन्यांचा पर्यटन व्हिजा काढला होता. त्यानंतर ते परत जाणार होते. मात्र, गोव्यात राहात असताना त्यांनी तेथेही गांजांची शेती केली. यात त्यांना अटक झाली. दोघांचेही पासपोर्ट जप्त करण्यात आले.
या खटल्याचा निकाल पूर्ण होइपर्यंत त्यांना भारतातून जर्मनीला जाता येणार नाही. या दोघांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी गोव्यातून थेट वाइमध्ये बस्तान बसविले. एका सैथानिकाच्या मदतीने त्यांना भाड्याने रो हाऊस मिळाला. विशष म्हणजे या रो हाउसचे भाडे महिन्याला पंधरा हजार रुपये होेते.
काहीही कामधंदा न करता हे दोघे भाडे देत होते. जर्मनीहून येताना सर्गेस याने आइचे एटीएम आणले होते. या एटीएमद्वारे तो जर्मनीशी संलग्न असणाऱ्या बँकेतून तो पैसे काढत होता. मात्र, तरीही त्यांना पैशाची चणचण भासायची. यातूनच त्यांनी पुन्हा गोव्यातील गाजांच्या शेतीचा डाव वाइत आखला.
जर्मनीला परत जाण्याची आशा धूसर
गाजांची शेती करणे व गांजा जवळ बाळगणे हा गुन्हा असून, हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर २० वर्षे ते जन्मठेपेपर्यंत कायद्यात तरदूत आहे. या जर्मन युवकांवर अशाप्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे सिद्ध झाल्यास परत जर्मनीला जाण्याची आशा त्यांची धूसर होइल.
दोघांचेही स्वभाव अत्यंत आक्रमक
सर्गीस आणि सेबेस्टिनयन या दोघांचे स्वभाव अत्यंत आक्रमक आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांना वारंवार प्रश्न केल्यानंतर दोघेही पोलिसांशी चिडून बोलत तसेच इंग्रजीमधून शिवीगाळ करत होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही ते बोट दाखवून तूला मी ठार मारेन, अशी धमकी द्यायचे. त्यांच्या शरीरात गांजाचा अंमल असल्यामुळे कदाचित त्यांची वर्तवणूक अशी, असावी.
एक वर्षे सन्यदलात नोकरी
सर्गीस याने जर्मनीच्या सैन्यात एक वर्षे नोकरी केली आहे. त्यानंतर त्याने ही नोकरी सोडून जगभर फिरण्याचा चंग बांधला. अत्यंत कमी वयामध्ये त्याने तब्बल ३५ देशांमध्ये पर्यटन केले आहे.