डोंगराला लागलेला वणवा युवकांनी रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:39 AM2021-04-07T04:39:48+5:302021-04-07T04:39:48+5:30
कऱ्हाड तालुक्यातील पाठरवाडीपासून गेलेली डोंगराची रांग पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडीपर्यंत गेली आहे. या डोंगराला वणवा लागल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आले. ...
कऱ्हाड तालुक्यातील पाठरवाडीपासून गेलेली डोंगराची रांग पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडीपर्यंत गेली आहे. या डोंगराला वणवा लागल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आले. शिद्रुकवाडी परिसरात लागलेला हा वणवा वाऱ्यामुळे झपाट्याने पाठरवाडीच्या दिशेने येत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनाधिकारी एम.आर. वंजारे, हंगामी वनमजूर जाधव यांनी पाठरवाडीतील युवकांना एकत्र केले. वणवा विझवण्याची मोहीम या सर्वांनी हाती घेतली. झाडांच्या डहाळ्या व इतर साधनांद्वारे पहाटे दोन वाजेपर्यंत प्रयत्न करून सर्वांनी पाठरवाडीच्या दिशेने येणारा वणवा विझवला. त्यामुळे या परिसरातील वन संपत्तीचे रक्षण झाले. रोहित यादव, प्रशांत यादव, शुभम यादव, साई पानस्कर, शिवाजी यादव, राजेंद्र यादव, प्रतीक यादव, गणेश यादव, निलेश यादव, रविराज यादव, ओमकार यादव या युवकांनी धाडस करून डोंगरावर लागलेला वणवा विझवला.
फोटो : ०६केआरडी०१
कॅप्शन : पाठरवाडी, ता. कऱ्हाड येथील युवकांनी डोंगराला लागलेला वणवा विझविल्यानंतर आनंद व्यक्त केला.