जिल्हा परिषद सदस्यांनी केली पाणीटंचाई दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:27+5:302021-05-15T04:36:27+5:30

ढेबेवाडी पवारवाडी (सणबूर), ता. पाटण येथील बोअरवेलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला व पाणीटंचाई निर्माण झाल्याने ...

Zilla Parishad members alleviate water scarcity | जिल्हा परिषद सदस्यांनी केली पाणीटंचाई दूर

जिल्हा परिषद सदस्यांनी केली पाणीटंचाई दूर

Next

ढेबेवाडी

पवारवाडी (सणबूर), ता. पाटण येथील बोअरवेलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला व पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट लक्षात घेऊन ढेबेवाडीचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी स्वखर्चाने गावाला पाणीपुरवठा केल्याने येथील पाणीटंचाई दूर झाली असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

सणबूर, ता. पाटण हे या विभागातील विस्ताराने व लोकसंख्येने मोठे असलेले गाव आहे. या ग्रामपंचायतींतर्गत अनेक वाड्या-वस्त्या आहेत. विविध योजनांद्वारे येथे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. सर्व पाणीपुरवठा योजना कार्यान्वितही आहेत.

मात्र, तीव्र उन्हाळ्यामुळे पवारवाडी येथील ग्रॅव्हिटी नळपाणी पुरवठा योजनेचा जलस्रोत आटल्याने तेथील बोअरवेलवर सगळा भार वाढला आहे. तेथील बोअरवेलची मोटार सौर ऊर्जेवर कार्यान्वित आहे. त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन /चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

सणबूर ग्रामपंचायत प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी व पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाणीपुरवठा खंडित झाल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई उपसरपंच संदीप जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून निदर्शनास आणून देत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी विनंती केली तेव्हा ती पाण्याची समस्या

सोडविण्यासाठी रमेश पाटील यांच्या सूचनेवरून त्यांच्या वैयक्तिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी विभागांमध्ये जिथे पाणीटंचाई निर्माण होईल तेथील ग्रामस्थांनी त्वरित आपल्या ढेबेवाडी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. टंचाईच्या काळात तातडीने पाणीपुरवठ्याची सोय केली जात असल्याने जनतेला दिलासा मिळत आहे. रमेश पाटील यांच्या या उपक्रमामुळे जनतेतून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.

रमेश पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून टंचाईग्रस्त गावाला स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.

-संदीप जाधव,

उपसरपंच, सणबूर

Web Title: Zilla Parishad members alleviate water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.