सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. ४२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५६६ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली.
जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षीत राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारावर सल्लामसलत करण्यात यावे यासाठी ई-संजीवनी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सध्य स्थितीत 95 लोकांनी लाभ घेतला आहे. नागरिकांनी ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीनपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे