सिंधुदुर्ग : जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत वस्तू स्वरुपात देण्यात येणाऱ्या योजनांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या असून खरेदी प्रक्रिया त्वरित होण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पशुसंवर्धन समिती सभेत दिले.जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा समिती सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, समिती सदस्य अनुप्रिती खोचरे, सुजाता हळदिवे, सोनाली कोदे, सावी लोके, स्वरूपा विखाळे, तालुका पशुधन अधिकारी आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ज्या वस्तू स्वरुपातील योजना आहेत त्यातील खरेदी प्रक्रिया त्वरित सुरू व्हावी यासाठी विभागाने आणि सदस्यांनी प्रयत्न करावेत, असे आदेश रणजित देसाई यांनी सभेत दिले.जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणारे राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी प्रदर्शन नोव्हेंबर महिन्यात कुडाळ येथे होणार आहे. त्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे सांगतानाच या प्रदर्शनाच्या नियोजनाची तयारी सुरू करा अशा सूचना सभापतींनी यावेळी केल्या.चांदा ते बांदा योजनेंतर्गत दुधाळ जनावरे आणि शेळी गट पुरविणे योजनेच्या याद्या मंजूर आहेत. मात्र अद्याप त्याचे वाटप झाले नसल्याची माहिती सभेत देण्यात आली.
खरेदी प्रक्रिया त्वरित करा : रणजित देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:12 PM
सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत वस्तू स्वरुपात देण्यात येणाऱ्या योजनांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या असून खरेदी प्रक्रिया त्वरित होण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पशुसंवर्धन समिती सभेत दिले.
ठळक मुद्दे खरेदी प्रक्रिया त्वरित करा : रणजित देसाईजिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभा