दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:25 PM2020-11-02T16:25:42+5:302020-11-02T16:27:15+5:30

Kankavli, muncipaltyCarporation, sindhudurgnews शहरातील नेते व नगरसेवक यांनी जो हलगर्जीपणाचा आरोप केला त्याची नगरपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.

Action will be taken against the guilty employees after thorough investigation! | दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

Next
ठळक मुद्देकणकवलीतील आग प्रकरणदोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

कणकवली : कणकवली शहरातील बाणे किराणा दुकानाला रविवारी आग लागली . त्यावेळी अग्निशामक बंब पाण्याशिवाय घटनास्थळी नेणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशी करून निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे . याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही . याप्रकरणी शहरातील नेते व नगरसेवक यांनी जो हलगर्जीपणाचा आरोप केला त्याची नगरपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.

येथील नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपनगराध्यक्ष बंधू हर्णे , आरोग्य सभापती अभिजीत मुसळे , संदीप नलावडे , किशोर राणे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते .

समीर नलावडे म्हणाले , रविवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आपण जिल्ह्याबाहेर होतो. आगी बाबत माहिती समजताच उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक व कर्मचाऱ्यांना सर्व सूचना दिल्या होत्या. दिलीप बिल्डकॉन या महामार्ग ठेकेदार कंपनीचा पाण्याचा टँकर घटनास्थळी मीच बोलावून घेतला होता .

टँकर यायला उशीर झाल्याने वाटेत टँकर थांबवून अग्निशामक बंबा मध्ये कर्मचाऱ्यांनी पाणी भरून घेतले . मात्र, या साऱ्या प्रकारात बंब घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे दुकानदार बाणे यांचे अधिक नुकसान झाले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो . मात्र, त्यानंतर नगरपंचायत बंबामुळेच संबधित आग आटोक्यात आणण्यात आली .

या घटनेवेळी कणकवलीतील नागरिक, नगरसेवक यांनी स्वयंस्फूर्तीने जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मी नगराध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो . याप्रकरणी सबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत . तसेच यापुढे असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून अग्निशामक बंबाच्या व्यवस्थेकडे आपण व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि नगरसेवक जातीनिशी लक्ष देणार आहोत .


या घटनेनंतर अग्निशमन बंबाच्या दैनंदिन कामकाजाची नोंदवही ठेवण्यात आली आहे . त्यामाध्यमातून नियमित डिझेल , पाणी व बंबाचा मेंटेनन्स चेक केला जाईल . त्यामुळे या घटनेत कुणीही विनाकारण राजकारण करू नये . असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.

ती चूक अक्षम्य !

नगरपंचायतीचा अग्निशामक बंब सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे कणकवलीत लागलेल्या आगीच्यावेळी बंबात पाणी नसणे ही कर्मचाऱ्यांची अक्षम्य चूक आहे. त्यांच्याकडून अजाणतेपणी ही चूक झाली आहे. त्याबाबत कारवाई होईलच. पण , याच कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेकवेळा आग आटोक्यात आणून नागरिकांना दिलासा दिला आहे. हे विसरून चालणार नाही.

अग्निशामक बंबाच्या टाकीची क्षमता सहा हजार लिटर पाणी साठविण्याची आहे. त्या बंबाच्या टाकीला लिकेज असले तरी ते वरच्या बाजूला असून त्यामुळे पाच हजार लिटर पाणी बंबात भरले जाते. ते लिकेज काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी यावेळी दिली.
 

Web Title: Action will be taken against the guilty employees after thorough investigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.