सुदेश भोसलेंच्या साथीने सावंतवाडीवासीय थिरकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 05:33 PM2017-12-31T17:33:38+5:302017-12-31T17:33:42+5:30
सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची तिसरी रात्र ‘मेलडी मेकर्स’ या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या हिंदी, मराठी जुन्या-नव्या गाण्यांनी यादगार ठरली.
सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची तिसरी रात्र ‘मेलडी मेकर्स’ या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या हिंदी, मराठी जुन्या-नव्या गाण्यांनी यादगार ठरली. आपल्या सुरेल आवाजात दर्दभरी गाण्यांच्या सादरीकरणाने भोसले यांनी उपस्थितांची हृदये जिंकली. मेरे मेहबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलिओमे शिकायत होगी.., ये जो मोहब्बत है ये उनका है काम रहने दो छोडो भी जाने दो यार, इंतेहा हो गई इंतजारकी.., अरे देखा ना हाय रे सोचा ना... अशी एकापेक्षा एक गाजलेली जुनी गाणी सादर करत सावंतवाडीकरांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवले.
सावंतवाडी नगरपालिका आयोजित पर्यटन महोत्सवाच्या तिसºया रात्री मुंबई येथील मेलडी मेकर्स हा सुदेश भोसले व सहकलाकारांच्या हिंदी, मराठी जुन्या-नव्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक विजेत्या स्पर्धकांचा कार्यक्रम पार पडला. यात मळेवाड येथील ज्ञानदीप कलामंच, मसूरकरवाडी यांचा माऊली माऊली... व ओंकार कलामंचचा लैला हो लैला... हा गु्रप डान्स लक्षवेधी ठरला. मेलडी मेकर्स या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथेप्रमाणे शिवरामराजे यांच्या पुतळ्याला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, काही वेळाने मंचावर एन्ट्री केलेल्या सुदेश भोसले यांनी सावंतवाडीकरांचे आभार व्यक्त करीत....भोले हो भोले मेरे यार को मनादे... ओ प्यार फिर जगा दे...हे गाणे सादर करीत किशोरकुमार यांची आठवण करून दिली. त्यानंतर मेरे मेहबूब कयामत होयी आज रुसवा तेरी गलिओ मे शिकायत होगी, ये जो मोहब्बत है ये उनका है काम रहने दो छोडो भी जाने दो यार, इंतेहा हो गई इंतजार की, अरे देखा ना सोचा ना, गोविंदा आला रे आला, मच गया शोर सारे नगरी मे... अशी नॉनस्टॉप गाणी सादर करीत सावंतवाडीकरांना फेर धरायला लावला. सर्वांनी टाळ््यांच्या कडकडाटात त्यांना प्रोत्साहन दिले.
अधूनमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्या आवाजाची झलकही त्यांनी सादर करीत उपस्थितांमध्ये हशा पिकविला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या खाईके पान बनारसवाला...छोरा गंगा किनारेवाला....या गाण्यावर लहान मुलांना मंचावर घेत फेर धरायला लावले. त्यानंतर तेरी मखणा..तेरी सोनीये... एव्हरी बडी शॉबा शॉबा, सोणा सोणा दिल मेरा सोणा हे दमदार गाणे कल्याणी व अमोल यांच्या साथीने सादर केले. भोसले यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थितांच्या पसंतीस उतरतील अशी मोजकी गाणी गात आपल्या गायकीची छाप सर्वांवर पुन्हा एकदा टाकली. मराठीतील वल्हव रे नाखवा, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का, अग हिल हिल पोरी हिला तुझ्या कपाळीला टिळा, गोविंदा रे गोपाळा ही गाणी भोसले यांनी सादर केली. एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाने तिसºया दिवशीची रात्र सर्वांसाठी यादगार ठरली.
चौकट
‘वन्स मोअर’सह रसिकांनी केला जल्लोष
यावेळी प्रसिध्द कलाकार राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत केलेले ‘गुलाबी आखे ये जो तेरी देखी...’ हे गीत गायक अमोल याने सादर करत कार्यक्रमात रंगत भरली.
त्यानंतर कैलास खैर यांच्या आवाजातील ‘प्रित की मोर ऐसी लागी..तेरी दिवानी..’. या गाण्याला उपस्थितांनी वन्स मोअर देत जल्लोष केला. त्यानंतर मंचावर आलेल्या कल्याणी या गायिकेने अमोल याला साथ देत आशा भोसले यांच्या आवाजातील ‘जवान जानेमन हसीन दिलरुबा..., सैराट झालं जी...हे गाणे सावंतवाडी पर्यटन महोत्सवात सादर केले. ते उपस्थितांच्या पसंतीस पडले.