निरपेक्षवृत्तीने काम करणाऱ्यांचा नेहमीच गौरव  : धनंजय चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:12 PM2020-10-12T14:12:12+5:302020-10-12T14:14:21+5:30

culture, sindhdudurgnews यावर्षीचा द्वारकानाथ शेंडे विशेष काव्य पुरस्कार गझल या साहित्य प्रकारात निष्ठेने काम करणाऱ्या गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांना देऊन गौरविताना आम्हांला अत्यानंद होत आहे, असे प्रतिपादन टिळक स्मारक वाचन मंदिराचे उपाध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले.

Always the glory of those who work impartially: Dhananjay Chitale | निरपेक्षवृत्तीने काम करणाऱ्यांचा नेहमीच गौरव  : धनंजय चितळे

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरकडून देण्यात येणारा व्दारकानाथ शेंडे विशेष काव्य पुरस्कार गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांना धनंजय चितळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देनिरपेक्षवृत्तीने काम करणाऱ्यांचा नेहमीच गौरव  : धनंजय चितळे मधुसुदन नानिवडेकर यांना पुरस्कार प्रदान

तळेरे : कोकणातील जी मंडळी निरपेक्षवृत्तीने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. त्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरकडून विविध पुरस्कार दिले जातात. त्यातील यावर्षीचा द्वारकानाथ शेंडे विशेष काव्य पुरस्कार गझल या साहित्य प्रकारात निष्ठेने काम करणाऱ्या गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांना देऊन गौरविताना आम्हांला अत्यानंद होत आहे, असे प्रतिपादन टिळक स्मारक वाचन मंदिराचे उपाध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले. ते पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.

या पुरस्कार वितरण प्रसंगी पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. संदीप गोनबरे, सुप्रसिद्ध निवेदक प्रसाद घाणेकर, जयलक्ष्मी नानिवडेकर, उज्ज्वला धानजी, कवी प्रमोद कोयंडे, पत्रकार निकेत पावसकर, हेमंत देवस्थळी आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मधुसुदन नानिवडेकर यांच्या घरी प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे आणि दहा हजार रुपये रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले.

नानिवडेकरांनी सादर केल्या गझला

यावेळी मधुसुदन नानिवडेकर यांनी विविध गझला सादर केल्या. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या सदस्या उज्ज्वला धानजी यांनी शाखेच्यावतीने स्वागत केले. नानिवडेकर यांनी वाचन मंदिर आणि प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, राठोड यांचे आभार मानले.

अभ्यासासाठी उपयुक्त

१६८ वर्षांची परंपरा असलेल्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे विविध प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू असतात. संपूर्ण कोकणातील १०० नामवंत व्यक्तींच्या तैलचित्रांचे कला दालन तयार केले आहे. त्यामुळे कोकणचा अभ्यास करायचा असेल तर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला डावलून पुढे जाताच येणार नाही, असे मत यावेळी धनंजय चितळे यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Always the glory of those who work impartially: Dhananjay Chitale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.