मसुरे येथे बिबट्याचे दर्शन; परिसरात घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:36 AM2019-08-27T11:36:54+5:302019-08-27T11:38:38+5:30
मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरानजीक शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस रात्रीच्यावेळी बिबट्या बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे.
मालवण : मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरानजीक शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस रात्रीच्यावेळी बिबट्या बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे.
मसुरे भागातील शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव जनावरांचा या बिबट्याने फडशा पाडला आहे. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान बिबट्या घराच्या परिसरात फिरत असल्याचे समीर प्रभूगावकर यांनी पाहिले. त्यांच्या कारजवळ तो उभा होता. त्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बिबट्या तेथून हलला नाही.
अखेर आरडाओरड करताच त्या बिबट्याने भरतगड किल्ल्याच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याची गंभीर दखल घेत त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.