नेरूरपार रस्त्यासाठी भाजपाचे आंदोलन, दुरुस्तीसाठीची डेडलाईन संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 03:19 PM2020-08-18T15:19:47+5:302020-08-18T15:20:49+5:30

कुडाळ-नेरूरपार-मालवण रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली डेडलाईन रविवारी संपल्यामुळे भारतीय जनता पार्टी, ग्रामस्थ व वाहनचालकांच्यावतीने नेरूरपार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

BJP's agitation for Nerurpar road, deadline for repairs ended | नेरूरपार रस्त्यासाठी भाजपाचे आंदोलन, दुरुस्तीसाठीची डेडलाईन संपली

नेरूरपार येथे भाजप व ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रणजित देसाई, विनायक राणे, संदेश नाईक, देवेंद्र नाईक, राकेश कांदे, निलेश साळसकर आदी सहभागी झाले होते.

Next
ठळक मुद्देनेरूरपार रस्त्यासाठी भाजपाचे आंदोलन, दुरुस्तीसाठीची डेडलाईन संपलीनाहीतर याहीपेक्षा मोठे जनआंदोलन उभारावे लागेल; रणजित देसाई यांचा इशारा

कुडाळ : कुडाळ-नेरूरपार-मालवण रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली डेडलाईन रविवारी संपल्यामुळे भारतीय जनता पार्टी, ग्रामस्थ व वाहनचालकांच्यावतीने नेरूरपार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई तसेच भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष विनायक राणे, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक यांनी केले. यावेळी देवेंद्र नाईक, राकेश कांदे, निलेश साळसकर, अजय आकेरकर, देविदास नाईक, मयूर पिंगुळकर, सत्यविजय कदम यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्ते उपस्थित होते.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलनाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटील यांनी भेट दिली. कोणत्याही परिस्थितीत या रस्त्यावरील सर्व खड्डे हे गणेश चतुर्थीपूर्वी पावसाळी डांबराने भरण्यात यावेत. तसेच पावसाळा संपताच या रस्त्याचे काम पूर्णपणे नव्याने करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दोन वर्षे या भागातील आमदार रस्ता मंजूर आहे असे जनतेला सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात माहिती घेतली असता या रस्त्याची निविदा प्रक्रिया झाली नसून राज्य शासनाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. ही गोष्टदेखील यावेळी विभागाच्यावतीने सांगण्यात आली.

रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार असे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आले असून गणेश चतुर्थीनंतर या रस्त्याचे काम पूर्णपणे नव्याने न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिला आहे.


 

Web Title: BJP's agitation for Nerurpar road, deadline for repairs ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.