भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आणा; नारायण राणेंनी केली प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 07:51 PM2020-01-07T19:51:05+5:302020-01-07T19:51:43+5:30

यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवर प्रहार केले.

Bring aggression among BJP workers; Narayan Rane demanded from the state president Chandrakant Patil | भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आणा; नारायण राणेंनी केली प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आणा; नारायण राणेंनी केली प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

Next

सिंधुदुर्ग -  भाजपा कोणत्या गोष्टीत कमी पडू नये यासाठी आता भाजप कार्यकत्यांमध्ये आक्रमकता आली पाहिजे हा गुण कार्यकत्यांमध्ये आणा अशी मागणी भाजपा खासदार नारायण राणे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली त्याचसोबत एक दादा दुसऱ्या दादाचं ऐकतो अशी टिपण्णीही राणेंनी केली. 

जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. सावंतवाडीत नगराध्यक्ष निवडून आणू शिवसेनेचे नाक कापले. जळगावपेक्षा सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे यश अचंबित करणारे आहे. मुंबई शिवसेनेचे नाक होते. पण तेथे शिवसेनेला नामोहरण केले आता लक्ष कोकण आहे असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. 
तसेच सावंतवाडीत भाजपने विधानसभेवेळी जर एबी फार्म दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते महा शिवआघाडी गेली आता महाराष्ट्र विकास आघाडी आली आहे. शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवर प्रहार केले. शिवसेना भाजप युती व्हावी असे मला वाटत नव्हते पण निवडणुकीनंतर शिवसेनेकडून दगा फटका केला त्यामुळे सिंधुदुर्गमधून शिवसेना संपवा असं आवाहन     नारायण राणे यांनी कार्यकर्ता बैठकीत केले. सावंतवाडीतील जनतेचे आभार मानतो कारण प्रथमच भाजपाचा सावंतवाडीत नगराध्यक्ष झाला. सर्वजण सोबत असल्याने यश मिळाले पक्ष मजबूत करणे हेच ध्येय आहे. महाराष्ट्रातील चिंता करू नका पण सिंधुदुर्गपासून रायगडपर्यत भाजपचा झेंडा फडकवू असं आवाहन नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना केले. 
 

Web Title: Bring aggression among BJP workers; Narayan Rane demanded from the state president Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.