बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर : बागायत येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:07 PM2017-10-24T18:07:33+5:302017-10-24T18:10:28+5:30

माळगाव-बागायत येथील शेतकरी अभिमन्यू धामापूरकर यांच्या राहत्या घरानजीक असणाऱ्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला व आतील वासरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली.

Calf attack: The incident in the garden | बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर : बागायत येथील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर : बागायत येथील घटना

Next
ठळक मुद्देभोगलेवाडी परिसर भयभीतगायीने ओरडून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

बागायत , दि. २४ : माळगाव-बागायत येथील शेतकरी अभिमन्यू धामापूरकर यांच्या राहत्या घरानजीक असणाऱ्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला व आतील वासरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली.


गेल्या काही महिन्यांपासून बागायत भोगलेवाडी परिसरात जंगलमय भागात तीन बिबट्यांचा मुक्त संचार असून हे बिबटे बऱ्याचवेळा ग्रामस्थांच्या नजरेस पडले आहेत.

यातील एक बिबट्या शनिवारी मध्यरात्री धामापूरकर हे व्हरांड्यात झोपले असता रात्री १२.३० च्या सुमारास त्यांना गोठ्यात वासराची व बिबट्याची झटापट ऐकू आली. गोठ्यातील गायीने ओरडून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर बिबट्याने वासरावर हल्ला करून वासराच्या मानेला पकडले.


यावेळी धामापूरकर यांनी आपला मुलगा प्रवीण व सून प्रज्ञा यांना गोठ्यात चाललेल्या झटापटीची घरात जाऊन माहिती दिली. त्यांचे शेजारी स्वप्नील धामापूरकर, सचिन धामापूरकर, नाना धामापूरकर, हनुमंत फणसेकर, दत्ताराम मालवणकर यांनी आरडाओरड ऐकून धामापूरकर यांच्या घराकडे धाव घेतली.


यावेळी ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्याने वासराला रक्तबंबाळ करून बागायत सडा परिसरातील जंगलमय भागात पलायन केले. गोठ्यापासून नजीकच असलेल्या घरातील व्हरांड्यात गायीचे दुसरे वासरू व स्वत: धामापूरकर झोपले असताना त्यांच्यापासून २० फूट अंतरावरील गोठ्यापर्यंत बिबट्याने मजल मारल्याने सारे भयभीत झाले आहेत.


धामापूरकर यांचा गोठा पक्का बांधलेला असून चारही बाजूला जाळे लावलेले असतानाही बिबट्याने जाळे फाडून गोठ्यात प्रवेश केला. याबाबत प्रवीण धामापूरकर यांनी वनपाल विश्वास यांना घटनेची माहिती दिल्यावर वनकर्मचारी पांचाळ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

यावेळी पोलीस पाटील किशोर जाधव, सरपंच नीलेश खोत, तातू भोगले, सुरेश रावराणे, बाबुराव भोगले आदी उपस्थित होते. कायद्याच्या चौकटीत राहून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन वनकर्मचारी पांचाळ यांनी ग्रामस्थांना दिले. या परिसरातील बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Calf attack: The incident in the garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.