सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 05:56 PM2017-11-15T17:56:25+5:302017-11-15T17:59:06+5:30

राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेशा अन्वये माहे जानेवारी - फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्राप्त झालेला असून ग्रामपंचायतींसाठी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Candidates from 16 Gram Panchayats in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या

Next
ठळक मुद्देहरकती व सूचना २१ नोव्हेंबर पर्यंत कराव्यात१६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी, : राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेशा अन्वये माहे जानेवारी - फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्राप्त झालेला असून ग्रामपंचायतींसाठी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मतदार यादीबाबत कोणतीही हरकत असल्यास संबंधित मतदाराने आपला हरकत अर्ज दिनांक २१ नोव्हेंबर रोजीपर्यंत (रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सुट्टीच्या दिवशीही) संबंधित तहसिलदार कार्यालयामध्ये समक्ष सादर करावायाचा आहे.

माहे जानेवारी- फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या १६ ग्रामंपचायतींशी संबंधित सर्व मतदारांनी याबाबत नोंद घ्यावी असे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. माहे जानेवारी - फेब्रुवारी 2018 मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायती कणकवली - बेळणेखुर्द, ओटव. देवगड- शिरवली, वळीवंडे, रामेश्वर, पावणाई, वानिवडे, फणसगांव, विठ्ठलादेवी. वेंगुर्ला - मातोंड, पेंडूर, खानोली, वायंगणी. कुडाळ- हुमरमळा-वालावल, वालावल, हुमरमळा- अणाव.

Web Title: Candidates from 16 Gram Panchayats in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.