किल्ले सिंधुदुर्ग दर्शन आजपासून ३ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:32 PM2017-12-29T23:32:11+5:302017-12-29T23:37:29+5:30

The caste Sindhudurg Darshan is closed for 3 days from today | किल्ले सिंधुदुर्ग दर्शन आजपासून ३ दिवस बंद

किल्ले सिंधुदुर्ग दर्शन आजपासून ३ दिवस बंद

Next


मालवण : मागण्यांचे निवेदन देऊन महिना उलटून गेला तरी बंदर विभागाकडून त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आज, ३० डिसेंबर ते १ जानेवारी या काळात किल्ले सिंधुदुर्गवरील प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवली जाणार असल्याचा निर्णय किल्ला होडी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
मालवण बंदर जेटी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी स्वप्निल आचरेकर, आप्पा मोरजकर, बाळा तारी, दादा आचरेकर, दिलीप आचरेकर, राजू पराडकर, काशिराम जोशी, बाळा तारी, प्रसाद सरकारे, अनंत सरकारे, बाळकृष्ण जोशी, आदी उपस्थित होते.
मंगेश सावंत म्हणाले, बंदरजेटी येथील गाळ कित्येक वर्षे काढलेला नाही. ओहोटीच्यावेळी बंदर जेटीला प्रवासी बोट लावता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना किल्ला न पाहता माघारी जावे लागते. तसेच दोन ते तीन बोटींची सांगड करून प्रवाशांना न्यावे लागते. त्याची नाराजी प्रवासी आमच्यावर दाखवतात. मंजूर जेटीच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. पद्मगड ते दांडी सिंधुदुर्ग या मार्गावर देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी. दोन मार्गामधील अंतर किमान पाच ते दहा किलोमीटरचे असावे. प्रमाणपत्रांची वैधता एक वर्षावरून पाच वर्षे करण्यात यावी.
वेंगुर्ले येथील जिल्हा प्रादेशिक अधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या ओरोस येथे असावे. नवीन फायबर बोटींना मालवण धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला मार्गावर परवानगी देण्यात येऊ नये. सिंधुदुर्ग किल्ला येथील नवीन जेटीवर प्रवासी शेड नाही.तसेच बांधण्यात आलेल्या जेटीला सुरक्षित बोट लावता येत नाही. तेथील चॅनल मोकळा करून मिळावा. आॅनलाईन सेवांमुळे सर्व व्यावसायिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ही सेवा सुरळीत होईपर्यंत पूर्वीची नोंदणी असलेल्या नौकांना आयव्हीअंतर्गत नोंदणी आॅफलाईन सेवा पुरविण्यात यावी या प्रमुख मागण्यांवर बंदर विभागाने ठोस असा कोणताच निर्णय दिलेला नाही. त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून आम्ही ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी या तीन दिवशी होडी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद ठेवणार आहोत. पर्यटकांना गैरसोयी होत असल्यानेच आम्ही उभारलेल्या लढ्याला मालवणवासीयांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मंगेश सावंत यांनी केले.
अशा आहेत मागण्या
उतारू परवान्याची वैधता पावसाळी हंगाम वगळता सर्व्हे प्रमाणपत्राच्या आधारे पाच वर्षे करण्यात यावी. थर्ड पार्टी इन्शुरन्स पाच लाखांवरून किमान एक लाखापर्यंत करावा. आयव्हीअंतर्गत प्रवासी संख्या किमान २० पेक्षा अधिक प्रवासी निर्धारित करावी. प्रवाशांसाठी बांधण्यात आलेला वाहनतळ सुरू करावा, अशा मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाला सादर केले होते.
किल्ला दर्शन जेटीवरूनच
ऐन पर्यटन हंगामात होडी व्यावसायिकांनी पुकारलेल्या होडी वाहतूक बंद करण्याच्या इशाºयाने पर्यटकांना मात्र किल्ले दर्शन जेटीवरूनच घेता येणार आहे.

Web Title: The caste Sindhudurg Darshan is closed for 3 days from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.