महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मोबदला गणेश चतुर्थीपूर्वी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:33 AM2019-08-27T11:33:23+5:302019-08-27T11:36:14+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्याना लवकरात लवकर मोबदला देऊन गणेश चतुर्थीपूर्वी वितरण करावे, अशी मागणी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.

Compensate highway project victims before Ganesh Chaturthi | महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मोबदला गणेश चतुर्थीपूर्वी द्या

महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मोबदला गणेश चतुर्थीपूर्वी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देमहामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मोबदला गणेश चतुर्थीपूर्वी द्यापरशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कणकवली तालुक्यातील ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यातील अनेकांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे प्रांत कार्यालयात देऊनही अद्याप दोन ते अडीच कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. या प्रस्तावांना लवकरात लवकर मान्यता देऊन गणेश चतुर्थीपूर्वी मोबदल्याचे वितरण करावे, अशी मागणी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.

याबाबत प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कणकवलीचे प्रांताधिकारी सध्या रजेवर आहेत. त्यांचा कार्यभार तात्पुरता राठोड यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
गणेश चतुर्थीपूर्वी सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचा मोबदला वितरित करा. धनादेशावर सही करण्याचे अधिकार संबंधित प्रांतांना देण्यात यावेत. तशाप्रकारे बँकांना कळवून कार्यवाही करावी.

यापूर्वी आपल्याशी १५ दिवसांपूर्वी चर्चा केली होती. त्या चर्चेच्या अनुषंगाने नव्याने रूजू झालेल्या प्रभारी प्रांत राठोड यांना अधिकार प्राधित करून प्रकल्पग्रस्तांचा मोबदला देण्यात यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. यावेळी परशुराम उपरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Compensate highway project victims before Ganesh Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.