कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार गेले दोन दिवस सातत्याने सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर नदीकाठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर माणगाव खोऱ्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे १५ आॅगस्ट रोजी रात्रभर आंबेरी पूल पाण्याखाली होता. रविवारी दुपारी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली. पुन्हा सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला.चतुर्थी सण जवळ आल्यामुळे पाऊस असाच चालू राहिला तर गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही जनजीवन विस्कळीत होणार आहे. कारण माणगाव खोऱ्यातील अनेक गावे नदीवरील कॉजवेंनी जोडलेली आहेत आणि कॉजवेवर थोडाजरी पाऊस झाला तरी पाणी येऊन वाहतूक खोळंबते. गेल्यावर्षी चतुर्थी काळात लोकांचे प्रचंड हाल झाले होते. यावेळीही तसे होऊ नये अशी प्रार्थना माणगाव खोऱ्यातील जनता करीत आहे.सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कुडाळ तालुक्यातील नद्यांना मोठा पूर आल्याने कुडाळ शहरातील काही भागात भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने धोका निर्माण झाला होता. तर माणगाव खोºयातील निर्मला नदीलाही पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला. तेथील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरला होता.
शनिवारी मात्र पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली. रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. कुडाळ शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर नाका तसेच काही इतर भागापर्यंत हे पुराचे पाणी आल्याने तेथील काही घरांना धोका निर्माण झाला होता. र
विवारी सकाळच्या वेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने पुराचे पाणी वाढत होते. पुन्हा एकदा पुराचे पाणी घरापर्यंत आल्याने येथील कुटुंबीयांना मात्र नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. संततधार पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आला होता.बांदा आळवाडीत तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी, यावर्षी तिसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेरबांदा परिसरात शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळी तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडीतील घुसले. काही भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला.काही दुकानात सकाळीच तेरेखोल नदीचे पाणी घुसल्यामुळे येथील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ग्रामपंचायत, महसूल, पोलीस प्रशासनाने आळवाडी येथे व्यापाऱ्याना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.गतवर्षीप्रमाणे संपूर्ण बांदा शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी तीनदा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन मच्छी मार्केट व बाजूच्या दुकानात घुसले.स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदतकार्य केले. बांदा शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते आळवाडी मच्छीमार्केट रस्ता रविवार सकाळपासून पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.