वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरांत पोष्टाची सेवा देणारे प्रमुख पोष्ट ऑफिस गुरूवारपासून कुलुपबंद करण्यांत आलेले असून या पोष्टऑफिसच्या दरवाज्यावर "वेंगुर्ला पोष्ट ऑफिसमध्ये कोरोना बाधित कर्मचारी मिळाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यत वेंगुर्ले पोष्ट ऑफिस बंद राहिल" असा सुचना फलक लावण्यांत आला आहे.
या फलकावरील सुचनेत तारखेचा उल्लेख नसलयाने ते किती दिवस बंद रहाणार आहे, हे ग्राहकांना समजू न शकल्याने नागरीकांत हा चर्चेचा विषय ठरला आहे. या फलकांवर तारीख नमुद न केल्याने ते केव्हापासून बंद करण्यांत आले आहे. हे समजण्यास मार्ग नाही.
शासनाच्या निर्देशानुसार एखाद्या शासकिय अथवा निमशासकिय ऑफिसमधील कर्मचारी कोरोना बाधित आढल्यास 48 तास ते बंद ठेवण्याचे आहेत. मात्र पोष्टऑफिसने लावलेल्या फलकावर तारीख नमुद नसल्याने ते केव्हा सुरू होणार हे समजून येत नाही.दरम्यान, वेंगुर्ले तहसिलदार यांनी तालुक्यातील संबधित शासकिय वा निमशासकिय अथवा संहकारी संस्था आस्थापने यांना शासनाचा 48 तासांच्या कालावधीत बंद ठेवण्याच्या नियमानुसार ते किती काळ बंद ठेवले जाईल. याची माहिती या फलकावर संबधितांनी जाहिर करावी किंवा ते कधी सुरू होईल याची माहिती समजण्यासाठी संपर्क नंबर त्या सुचना फलकावर लिहिण्यांत यावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.