corona virus - पालकमंत्र्यांच्या परिक्षेत पोलीस यंत्रणा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 03:06 PM2020-03-24T15:06:09+5:302020-03-24T15:08:08+5:30
पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: वैभववाडी येथील तपासणीनाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आपले कर्तव्य बजावीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
सिंधुदुर्ग : पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: वैभववाडी येथील तपासणीनाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आपले कर्तव्य बजावीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
वैभववाडी पोलीस तपासणी नाक्यावर उदय सामंत यांनी त्यांच्या अंगरक्षकास साध्या गाडीतून पुढे पाठवले व स्वत: मागे थांबले. अंगरक्षकाला पोलिसांची मुद्दामहून जाणारच असे सांगण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्या प्रमाणे हा अंगरक्षक साध्या गाडीने चेकपोस्टवर पोहोचला. त्यास नियमाप्रमाणे पोलिसांनी थांबलले व त्याची तपासणी केली.
त्यानंतर त्यास आपण जिल्ह्यात पुढे जाऊ शकत नाही असे सांगितले. त्यावर त्या अंगरक्षकाने आपण जाणारच असे सांगितले तरी पोलिसांनी कोणतेही दडपण न घेता त्यास पुढे जाण्यास परवानगी नाकारले. यानंतर स्वत: पालकमंत्री सामंत या ठिकाणी आले व पोलीस करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. पोलीस व आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. अशाच प्रकारे यंत्रणांनी काम करावे असे त्यांनी सांगितले.
कायद्याची कडक अंमलबजावणी करणार
पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना विषयी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. तरी नागरिकांनीही सध्याच्या परिस्थितीमध्ये घरा बाहेर न पडता सहकार्य करावे अन्यथा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.