corona virus : मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 01:54 PM2020-08-18T13:54:04+5:302020-08-18T13:56:19+5:30

कोरोनामुक्त राहिलेल्या मालवण शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ हाती घेतल्या आहेत. औषध फवारणी करून संपूर्ण शहर निजंर्तुकीकरण केले जात आहे. मच्छिविक्रेते व भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Corona virus: On-the-spot health check-up of fish and vegetable sellers | corona virus : मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी

corona virus : मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी

Next
ठळक मुद्देमच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणीबैठकीत निर्णय : संपूर्ण मालवण शहर निर्जंतूक करणार

मालवण : कोरोनामुक्त राहिलेल्या मालवण शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ हाती घेतल्या आहेत. औषध फवारणी करून संपूर्ण शहर निजंर्तुकीकरण केले जात आहे. मच्छिविक्रेते व भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मालवण शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर शहर कोविड नियंत्रण समितीची तातडीची बैठक नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती पूजा सरकारे, बांधकाम सभापती यतीन खोत, गटनेते गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, दीपक पाटकर, जगदीश गावकर, पंकज सादये, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, सुनिता जाधव, आकांक्षा शिरपुटे यासह सदस्य अमित खोत, उमेश मांजरेकर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्ण मिळत असलेले ठिकाण व परिसर निजंर्तुकीकरण करण्यात आला आहे. डॉक्टरसह अन्य कर्मचारी कोरोनाबाधित झालेले शहरातील खासगी रुग्णालय सोमवारपर्यंत सील करण्यात आले आहे. रुग्ण राहत असलेल्या अन्य इमारतीचा किती परिसर कंटेन्मेंट करायचा याबाबत प्रांताधिकारी निर्णय घेणार आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्यथा कारवाई करण्याचा इशारा

गेले चार महिने मालवण शहर कोरोनामुक्त राहिले. यात सर्वांचेच श्रेय आहे. मात्र, आता रुग्ण संख्या वाढत असल्याने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढणार नाही. यासाठी खबरदारी नियमांचे पालन प्रत्येकाने करावे. शहरात विनाकारण फिरणारे व सोशल डिस्टन्स नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनामार्फत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बाजारपेठ सुरू राहणार

बाजारपेठ आहे त्या वेळेत सुरू राहणार आहे. तरी व्यापारी वर्गाने अधिक खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडणार नाही याची काळजी घ्यावी. भाजी, फळे विक्रेते यांनीही सामायिक अंतर ठेवून गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन व्यवसाय करावा, असे आवाहन नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केले.

Web Title: Corona virus: On-the-spot health check-up of fish and vegetable sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.